बुलेटच्या नंबरप्लेटवर 'रॉयल कारभार'; पोलिसांनी ठोठावला दंड हजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 16:08 IST2019-10-09T16:06:34+5:302019-10-09T16:08:45+5:30
ट्वीटची दखल घेत वाहतूक पोलिसांनी केली कारवाई

बुलेटच्या नंबरप्लेटवर 'रॉयल कारभार'; पोलिसांनी ठोठावला दंड हजार
ठाणे - वाहतुकीचे नियमांची होणारी पायमल्ली पाहता वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक पोलिसांनी कळव्यात अशाच एका बुलेटप्रेमीला फॅन्सी नंबरप्लेटमुळे १ हजाराचा दंड ठोठावला आहे. जगदीश पोपटराव पोन असं बुलेट चालकाचं नाव आहे.
एमएच ०४; जेसी ८७६३ या क्रमांकाची बुलेट कळव्यातील मनीष विद्यालयासमोर आणि माजी महापौर मनोहर साळवी यांच्या बंगल्यानजीक पार्क केलेली होती. या बुलेटच्या मागील नंबर प्लेटवर दुचाकीचा क्रमांक न टाकता रॉयल कारभार असं लिहिण्यात आलं होतं. याबाबत ट्वीट ठाणे पोलीस आणि वाहतूक पोलिसांना टॅग करण्यात आलं होतं. या ट्वीटची तात्काळ दखल घेत वाहतूक पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी ई-चलान बजावून बुलेटचालकास १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
E-challan generated pic.twitter.com/nDgRD3GCt9
— Thane City Police (@ThaneCityPolice) October 9, 2019