Robbery with a toy gun in a police net | टॉय गनच्या साहाय्याने लुटणारी दुकली पोलिसांच्या जाळ्यात
टॉय गनच्या साहाय्याने लुटणारी दुकली पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई : टॉय गनच्या साहाय्याने पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना लुटणाºया दुकलीला पार्कसाइट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निहाल हरपाल सिंग उर्फ किंग (२८), मोहम्मद अब्दुल रेहमान शेख (२२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.


पार्कसाइट पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ हे गस्तीवर होते. त्याच दरम्यान विक्रोळी एलबीएस रोड परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास दोघे बंदुकीच्या धाकात धमकावत असल्याचे दिसले. त्यानुसार, पथकाने तत्काळ त्यांच्या दिशेने धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अटक केली.

यात निहाल हा चेंबूर कॅम्पचा तर मोहम्मद दादरचा रहिवासी आहे. त्यांच्याकडून जप्त केलेले पिस्तूल हे खेळण्यातले आहे. चौकशीत ते गुल्हाटी पेट्रोलपंपावरही कॅशच्या लुटीसाठी आल्याचे स्पष्ट होताच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यांना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Robbery with a toy gun in a police net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.