शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

Rinku Sharma Murder Case : ज्याच्या पत्नीला रक्तदान करून दिलं जीवदान; 'त्याच' इस्लामने घेतले रिंकू शर्माचे प्राण?

By पूनम अपराज | Published: February 12, 2021 3:20 PM

Rinku Sharma Murder in Delhi : रिंकूने आवश्यकतेच्या वेळी हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक इस्लाम या आरोपीच्या पत्नीला आपले रक्त दिल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देप्रसूतीच्या वेळी तिची तब्येत खालावली, ज्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात रक्त आवश्यक होते. यावेळी रिंकूने आपले रक्त दिले.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील मंगोलपुरी भागात बजरंग दलाचे कार्यकर्ता रिंकू शर्माची निर्घृण हत्या केल्याने तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी चार गुन्हे दाखल करून चार आरोपींना अटक केली आहे. मृत रिंकू सामाजिक कार्यात भाग घ्यायचा. दरम्यान, रिंकूने आवश्यकतेच्या वेळी हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक इस्लाम या आरोपीच्या पत्नीला आपले रक्त दिल्याचे उघडकीस आले आहे.

एका दैनिक वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, हत्या झालेल्या आरोपीची पत्नी गरोदर होती. रिंकूच्या शेजाऱ्याने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. प्रसूतीच्या वेळी तिची तब्येत खालावली, ज्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात रक्त आवश्यक होते. यावेळी रिंकूने आपले रक्त दिले. इतकेच नव्हे तर कोरोनाची लागण झाली तेव्हा रिंकूनेही इस्लामच्या भावाला रुग्णालयात दाखल केले होते.तीन भावांपैकी मोठा असलेला रिंकू हा त्याच्या घरातील एकमेव कमवता सदस्य होता. आजारपणामुळे वडिलांनी नोकरी सोडली. मंगोलपुरी घरापासून थोड्या अंतरावर दानिश उर्फ ​​लाली, इस्लाम, मेहताब उर्फ ​​नातू आणि जाहिद उर्फ ​​छिंगू या ब्लॉकमध्ये राहतात. दसर्‍याच्या राम मंदिर पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमाबद्दल रिंकू आणि चौघांमधील खटका उडाला होता.हल्लेखोर पूर्ण तयारीसह आले होतेएफआयआरनुसार दानिश हा त्याचे नातेवाईक इस्लाम, मेहताब आणि जाहिदसमवेत बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास घरासमोर रस्त्यावर आला. प्रत्येकाच्या हातात शस्त्रे आणि दंडुके होते. हे लोक रिंकूच्या घराबाहेर आले आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली. आरोपी घरात घुसले. इस्लामने येऊन रिंकूचा गळा पकडला आणि त्याच्यावर हल्ला केला असा आरोप आहे. मेहताबने रिंकूवर चाकूने हल्ला केला.'संपूर्ण रस्त्यावर रक्त पसरलेले'मृत रिंकूची आई राधा शर्मा यांनी टाईम्स नाऊशी बोलताना सांगितले की, ती आदल्या दिवशी माझ्या मुलाला घराबाहेर फरफटत बाहेर काढले होते.  एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले होते. त्याची तब्येत ठीक नव्हती, तो वाढदिवसाला जाऊन घरी पार्ट आला. तेव्हा त्याने त्याला घराबाहेर फरफटत नेलेआणि नंतर त्याला मारहाण करत चाकूने वार केले. त्या पुढेम्हणाले, "इतके रक्त सांडले होते की संपूर्ण रस्ता रक्ताने माखला होता."चाकू रिंकूच्या पाठीत घुसवला होता. जेव्हा मनु आणि रिंकू ओरडला तेव्हा रिंकूचे मित्र आला. जेव्हा मित्राने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चौघांनी त्याच्यावरही हल्ला केला. मनू आपला भाऊ रिंकूला संजय गांधी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. जेथे त्याचा भाऊ आणि मित्रालाही दाखल केले. डॉक्टरांनी रिंकूच्या शरीरातून चाकू बाहेर काढला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चाकू पुरावा म्हणून ताब्यात घेतला.

टॅग्स :Murderखूनdelhiदिल्लीPoliceपोलिसRinku Sharmaरिंकू शर्मा