उल्हास नदीमध्ये उडी मारून रिक्षाचालक तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:04 IST2022-02-23T14:03:29+5:302022-02-23T14:04:10+5:30
Suicide Case : या आत्महत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

उल्हास नदीमध्ये उडी मारून रिक्षाचालक तरुणाची आत्महत्या
बदलापूर: बदलापूरच्या वडवली भागात राहणाऱ्या गुरूनाथ म्हात्रे या रिक्षाचालकाने उल्हास नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
आज सकाळी 11 वाजता एरंजाडच्या दिशेने जाणाऱ्या उल्हास नदी पुलावरून रिक्षाचालक गुरुनाथ म्हात्रे यांनी आपली रिक्षा पूलावरच थांबवत थेट उल्हास नदीत उडी मारली. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळतात अग्निशामक दलाच्या जवानांनी त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्बल 40 मिनिटे शोध कार्य केल्यानंतर त्याचा मृतदेह अग्निशामक दलाच्या हाती लागला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील राजकीय पुढाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गुरुनाथ यांना शोधण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनसोबत स्थानिक ग्रामस्थ देखील या शोध मोहिमेत सहभागी झाले होते.