जास्त व्याज देतो असे अमिष दाखवून सेवानिवृत्त शिक्षकाला ५८ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 18:16 IST2021-02-10T18:15:46+5:302021-02-10T18:16:49+5:30
Duped Retired Teacher's Money : गणेशपूर येथील सेवानिवृत्त शिक्षक आंनदराव हरबाजी बोढाले यांनी शेती विकल्यानंतर दोन कोटी रूपये मिळाले.

जास्त व्याज देतो असे अमिष दाखवून सेवानिवृत्त शिक्षकाला ५८ लाखांचा गंडा
वणी (यवतमाळ) - शहरालगतच्या गणेशपूर येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाला जास्त व्याज मिळवून देतो, म्हणून एका भामट्याने ५८ लाखाने गंडविले. याप्रकरणी आरोपीविरूद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेशपूर येथील सेवानिवृत्त शिक्षक आंनदराव हरबाजी बोढाले यांनी शेती विकल्यानंतर दोन कोटी रूपये मिळाले. त्यांनी दोन मुलींना त्याचा हिस्सा देऊन २० लाख रूपये जवळ ठेवले. यादरम्यान, त्यांची ओळख कन्हैया कुमार (रा.देवनारायण राम, नेगुरसराई, जि.चंदेरी ऊतरप्रदेश) हल्ली मुक्काम मेघदूत काॅलनी याच्याशी झाली. आनंदराव बोढाले यांच्याकडे शेती विक्रीचे पैसे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याने बोढाले यांना कोल इंडिया सोसायटी लि. मध्ये गुंतवणूक केली तर १४ टक्के व्याजदर मिळते, असे अमिष दाखवून बोढाले यांना ५८ लाखांचा गंडा घातला.