शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
3
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
4
तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
5
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
6
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
7
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
8
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
9
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
10
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
11
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
12
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
13
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
14
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू
15
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
16
आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी
17
Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप
18
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
19
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
20
Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Satara Crime: निवृत्त पोलिसाला घरातच ११ दिवस ठेवले डिजिटल अरेस्ट, साताऱ्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:41 IST

Satara Cyber Crime News: अकाउंटमध्ये इंटरनॅशनल फंडिंग आल्याचे भासवून पाच लाख उकळले

सातारा : एका वयोवृद्ध सेवानिवृत्त पोलिसाला घरात अकरा दिवस डिजिटल अरेस्ट करून तब्बल ५ लाख ३५ हजारांना गंडा घालण्यात आला. या प्रकारानंतर संबंधिताने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा सारा प्रकार २ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडला.सातारा शहराला लागून असलेल्या एका गावात संबंधित ७४ वर्षीय सेवानिवृत्त पोलिस वास्तव्य करीत आहेत. २ ऑगस्ट रोजी त्यांच्या मोबाइलवर एक फोन आला. कुलाबा पोलिस स्टेशन येथील सीबीआय पोलिस असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही क्षणातच त्यांच्या मोबाइलवर व्हिडीओ काॅल आला. या काॅलमध्ये गणवेशात आयपीएस अधिकारी त्यांना दिसले. त्यांनी ‘तुमच्या अकाउंटमध्ये इंटरनॅशनल फंडिंग झाले आहे. त्यामुळे चाैकशी होईपर्यंत तुम्हाला आम्ही अरेस्ट करीत आहोत,’ असे सांगितले.यावर संबंधित वयोवृद्ध पोलिसाने त्यांना माझे एकच बँक अकाउंट आहे, असे उत्तर दिले. परंतु तोतया सीबीआय ऑफिसरने त्यांना आंध्र प्रदेशमधूनही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले दिसत आहे. हे तुम्हाला मिटवायचे असेल तर आम्ही सांगेल तसे करा, अो सांगितले. या प्रकारामुळे ते भयभीत झाले. त्यांनी कोणालाही याची माहिती दिली नाही. घरात तब्बल ११ दिवस ते डिजिटल अरेस्टमध्ये होते.यादरम्यान, त्यांना गुगलपेवर वेळोवेळी रक्कम पाठविण्यास सांगून त्यांच्याकडून ५ लाख ३५ हजार ५९९ रुपये संबंधित तोतया अधिकाऱ्याने उकळले. काही दिवसांनंतर त्यांना आपण फसलो गेलो, याची जाणीव संबंधीत निवृत्त पोलिसाला झाली. अखेर ३० सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे हे अधिक तपास करीत आहेत.

यामुळे बसला ‘त्यांचा’ विश्वासव्हिडीओ काॅलमध्ये आयपीएस अधिकारी दिसल्याने त्यांचा विश्वास बसला. परंतु आपण फसल्याचा त्यांना पश्चाताप होतोय. हा प्रकार त्यांनी कुटुंबात कोणालाही सांगितला नाही. पोलिस दलातून निवृत्त होऊन त्यांना बरीच वर्ष झाली आहेत. त्यांच्यासाठी हा नवा फ्राॅड होता. त्यातच त्यांचे वय झाल्यामुळे त्यांच्या हातून हे घडलं, असे पोलिस सांगताहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील ही दुसरी घटना असून, यापूर्वी असाच प्रकार कऱ्हाड येथे घडला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Retired Policeman Duped of ₹5.35 Lakh in Digital Arrest Scam

Web Summary : A 74-year-old retired policeman in Satara was defrauded of ₹5.35 lakh. Impersonating CBI officers via video call, scammers claimed international funding issues and kept him under 'digital arrest' for 11 days, extorting money.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस