शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुंबईच्या लोकलमध्ये माकडचाळे करणारी ही टपोरी टोळी दिसल्यास पोलिसांना कळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 19:47 IST

या व्हिडिओत दिसणारे टवाळखोर नक्की कोण आहेत? याबद्दलची कोणतीही माहिती अदयाप समोर आलेली नाही

 

मुंबईमुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनमधील माकडचाळे करून आपला जीव धोक्यात घालणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही हार्बर मार्गावर अशी टपोरी मुलांचे प्रकार वरचेवर होताना दिसतात.असाच एक प्रकार रविवारी पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास हार्बर मार्गवरील जीटीबी स्थानक आणि चुनाभट्टी स्थानकादरम्यानच्या प्रवासातील जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आला आहे.या टपोरी मुलांना अद्दल घडविण्यासाठी पोलिसांनी जर कोणास हि मुलं दिसली तर त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन नागरिकांना केले आहे. 

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसणारे टवाळखोर नक्की कोण आहेत? याबद्दलची कोणतीही माहिती अदयाप समोर आलेली नाही. या व्हिडिओत स्टंट करणाऱ्यांपैकीच एकाने सेल्फी कॅमेराने शूट केलेला दिसत असून चौघांपैकी एकजण धावत्या ट्रेनच्या छतावर चढताना दिसत आहे. तर इतर मुलं दरवाजाला आणि खिडकीला लटकल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या हुल्लडबाजांनी प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावल्याचेही या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये जीटीबी स्थानकात या चौघांपैकी एकजण उतरलेला दिसतो. तसेच ट्रेन सुरु झाल्यावर ती वेग पकडू लागते तसा काळ्या टी-शर्टमधील हा तरुण धावू लागतो. त्याच वेळी त्याच्या टोळीतील एकजण दरवाजाला लटकून बाहेर झेपावत प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतो. हा संपूर्ण घटनाक्रमही या व्हिडिओत कैद झाला आहे. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाlocalलोकलcentral railwayमध्य रेल्वेHarbour Railwayहार्बर रेल्वेPoliceपोलिसMumbaiमुंबई