ओळख लपवून तरुणीशी ठेवले संबंध, भेटणे बंद केल्यावर अश्लील फोटो केले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 21:03 IST2020-06-08T21:01:08+5:302020-06-08T21:03:07+5:30
आरोपी युवकाने आपले नाव, इतर ओळख लपवून बनावट मार्गाने आधार कार्ड व इतर कागदपत्रेही बनविली होती.

ओळख लपवून तरुणीशी ठेवले संबंध, भेटणे बंद केल्यावर अश्लील फोटो केले व्हायरल
उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मेरठच्या मुंडाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाने आपली ओळख लपवत हापुरीत राहणाऱ्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्यानंतर शारीरिक संबंध ठेवले. आरोपी युवकाने आपले नाव, इतर ओळख लपवून बनावट मार्गाने आधार कार्ड व इतर कागदपत्रेही बनविली होती.
मेरठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हापूर येथील रहिवासी असलेल्या एका युवतीने पोलिसात तक्रार दिली की, मेरठ येथील व्यक्तीने आपली ओळख लपवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि लग्नासाठी दबाव आणला असता आरोपीने आपली खरी ओळख उघड केली. या युवकाने आपले नाव दिनेश रावत असे बदलेले, यासाठी त्याने बनावट आधार कार्डही बनवले होते. जेव्हा त्याची पोल उघड झाली तेव्हा त्याचे नाव वसीम अहमद असे निघाले. आपली ओळख लपवण्यासाठी या युवकाने त्याच्या नावावर बनावट कागदपत्रेही बनविली होती.
या युवकावर आरोप आहे की, तरूण आधीच विवाहित आहे आणि त्याला दोन मुले आहेत. दिनेश रावत या नावाने त्याचे बोगस फेसबुक अकाउंट आहे. बनावट कागदपत्रांमध्ये दिनेश रावत हा विजय सिंग यांचा मुलगा, राहणार जाकिर कॉलनी पोलीस ठाण्यात राहण्याचे नाव लिसाडी गेट असे आहे. पीडितेचा आरोप आहे की तिने आरोपींशी संगती करणे थांबवले, त्यानंतर आरोपीने तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले, पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलमधूनही जप्त केले.
हे प्रकरण २ वर्षांपूर्वीची आहे. सुमारे २ वर्षांपूर्वी त्याने हापूर येथील रहिवासी युवतीशी मैत्री केली होती, त्याने एसपी ग्रामीण भागात तक्रार केली. एसपी देहत अविनाश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून शनिवारी रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आली.
अन्य महत्वाच्या बातम्या :
धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत
खूनप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत दाखल
३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत
आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित
उमरग्यात खून करुन पुण्यात आलेल्या दोघांना अटक
लॉकडाऊन दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली चालवले जात होते सेक्स रॅकेट
चोरांनी दिलं पोलिसांना खुलं आव्हान; फिल्मी स्टाईलनं सांगितली चोरीची वेळ अन् तारीख