शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

रेखा जरे हत्याकांड: बोठेच्या बंगल्याची झडती, रिव्हॉल्व्हर केले जप्त; लुकआऊट नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 07:41 IST

जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात हत्या झाली होती. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे.

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घराची शुक्रवारी पोलिसांनी झडती घेतली. झडतीत बोठे याचे रिव्हॉल्व्हर व इतर काही वस्तू जप्त करण्यात आल्या असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. जरे यांच्या हत्याकांडाचा उलगडा होताच बोठे फरार झाला. तो परदेशात पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी विमानतळ व्यवस्थापनांना बोठे याच्याबाबतची लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे त्याचा परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. 

जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात हत्या झाली होती. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्येची सुपारी बोठे व सागर भिंगारदिवे यांनी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. भिंगारदिवे याला अटक झाली असली तरी बोठे मात्र फरार झाला. फरार होताना त्याने त्याचे मोबाईल घरीच ठेवले होते. पोलिसांनी मोबाईल जप्त केले आहेत, तसेच बोठे याच्या  शोधासाठी विविध ठिकाणी पाच पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. शुक्रवारी दुपारी तपासी अधिकारी अजित पाटील यांच्या व एलसीबीच्या पथकाने बोठे याच्या नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील जिद्ध या बंगल्याची झडती घेतली. यावेळी पोलिसांना बोठे याचे रिव्हॉल्व्हर मिळून आले. बोठे याच्याकडे शस्त्र परवाना आहे, तसेच तपासात महत्त्वपूर्ण ठरतील अशा काही वस्तूही मिळून आल्या आहेत.

कितीही पळाला तरी पोलीस आवळणार मुसक्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे याचा पोलिसांकडून चौफेर शोध सुरू आहे. तो कुठे थांबू शकतो याचा अंदाज घेऊन पोलीस शोध घेत आहेत. येणाऱ्या काळात गरजेनुसार त्याचे बँक अकाउंटही गोठविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पसार झाल्यानंतर बोठे याला कोण आश्रय देऊ शकते, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. त्यामुळे कितीही पळाला तरी पोलीस बोठे याच्या मुसक्या आवळणारच हे निश्चित आहे. 

पोलिसांच्या तपासाचे कौतुक जरे यांची हत्या झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या घटनेचा उलगडा करीत मारेकऱ्यांसह इतर आरोपींना अटक केली, तसेच मुख्य सूत्रधाराचेही नाव समोर आणले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: या तपासात लक्ष घातले होते. तपासी अधिकारी अजित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल ककटे यांच्या पथकानेही मोठे परिश्रम घेतले. या गुन्ह्याचा जलदगतीने तपास झाल्याने पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  

बोठेच्या अटकेनंतरच होणार उलगडा हत्याकांडात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असली तरी सुपारी देऊन ही हत्या का केली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. जरे यांची हत्या का केली ही बाब बोठे यालाच माहीत असल्याचे अटकेत असलेला आरोपी सागर भिंगारदिवे याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे बोठे याला अटक झाल्यानंतरच या हत्याकांडाचा खुलासा होणार आहे. 

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस