Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:19 IST2025-11-21T12:17:22+5:302025-11-21T12:19:50+5:30
Delhi Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
दिल्ली लाल किल्ला स्फोटाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपींना एन्क्रिप्टेड एप्लिकेशन्सद्वारे परदेशातून सुसाईड बॉम्बिंगचे व्हिडीओ पाठवण्यात आले होते. दिल्लीस्फोटांची चौकशी करणाऱ्या एजन्सींनी खुलासा केला की, सुसाईड बॉम्बिंगचे व्हिडीओ जैशच्या डॉक्टर मॉड्यूलसोबत शेअर केले जात होते. मॉड्यूलच्या परदेशी हँडलर्सनी असे ३६ हून अधिक व्हिडीओ डॉक्टरांसोबत शेअर केले होते. हे डॉक्टरस्फोटात सहभागी होते आणि त्यांना तपास संस्थांनी अटक केली आहे.
अटक केलेल्या डॉक्टरांपैकी एक डॉ. मुझम्मिल अहमद गनी आहे. चौकशीदरम्यान या डॉक्टरने तपास संस्थांना संपूर्ण कार्यपद्धती सांगितली. डॉ. मुझम्मिल अहमद गनीने तपास संस्थांना सांगितलं की, या व्हिडिओंमध्ये सुसाईड बॉम्बिंगचा हेतू आणि त्यांच्यात अशा प्रवृत्ती कशा विकसित झाल्या याबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. तपास संस्थांच्या मते, असे व्हिडीओ जगभरातील इतर दहशतवादी संघटना देखील वापरतात.
"आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
लाल किल्ला स्फोट मॉड्यूलचा मास्टरमाईंड मुझम्मिल व्यतिरिक्त असे व्हिडीओ कोणी पाठवले होते, याचा तपास आता तपास यंत्रणा करत आहेत. या व्हिडिओंद्वारे हे दहशतवादी स्वतःच्या पैशाने बॉम्ब बनवत होते आणि स्वतः खरेदी करत होते. यावरून त्यांची कट्टरता दिसून येते. रिपोर्टनुसार, या दहशतवाद्यांनी स्वतः २६ लाख रुपये गोळा केले होते आणि चार वाहनं घेतली होती. या व्हिडिओंमुळे डॉ. मुझम्मिल आणि डॉ. उमर यांचं ब्रेनवॉशिंग झालं होतं.
नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
इंडियन एक्सप्रेसमधील रिपोर्टनुसार, दिल्ली प्रकरणातील तीन हँडलर्सची ओळख 'हनजु्ल्लाह', 'निसार' आणि 'उकासा' अशी झाली आहे. हे कोडनेम असू शकतात. या रिपोर्टनुसार, 'हनजु्ल्लाह' नावाचा वापर करणाऱ्या एका व्यक्तीने मुझम्मिलला अंदाजे ४० व्हिडीओ पाठवले. स्फोटात वापरलेली स्फोटकं गोळा करणारा व्यक्ती मुझम्मिलला होता. तपास यंत्रणांनी दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे आणि इतर अनेकांची चौकशी करत आहेत.