शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

'लेटर वाचून फाडून टाक...'; शिक्षकानं 8व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला लिहिलं 'प्रेम पत्र' अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 16:08 IST

पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत न्याय मागितला आहे...

उत्‍तर प्रदेशातील कन्नौजमधील एका प्रायमरी शाळेचा शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला. एवढेच नाही, तर त्याने तिला प्रेम पत्रही (love letter) लिहिले. पीडित विद्यार्थिनीने घडलेली संपूर्ण घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. यानंतर, पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत न्याय मागितला आहे.

ही घटना कन्नौज सदर कोतवाली हद्दीतील एका गावात घडली आहे. येथील प्रायमरी शाळेत शिकवणारा शिक्षक 8 व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला. तो शिकवण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीसोबत छेडछाडही करत होता. शाळेला सुट्ट्या लागण्यापूर्वी या शिक्षकाने संबंधित विद्यार्थिनीला पत्र लिहून प्रेम व्यक्त केले. एवढेच नाही, तर तिला भेटण्यासाठीही बोलावले. या संपूर्ण घटनेनंतर संबंधित विद्यार्थिनी गडबडली आणि तिने आपल्या पालकांना पत्र देत संपूर्ण प्रकार सांगितला.

यासंदर्भात बोलताना पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले, की हा प्रकार समजल्यानंतर आम्ही संबंधित शिक्षकाकडे गेलो  आणि त्याला माफी मागायला सांगितले. मात्र, त्याने तेथे आमच्यासोबतच वाद घातला आणि आम्हाला हकलून लावले. यानंतर, त्यांनी सदर कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. 

"पत्र वाचून फाडून टाक, कुणालाही दाखवू नकोस"- "माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. सुट्टीमध्ये तुझी खूप आठवण येईल. मी तुला खूप मिस करेन. तुला फोन मिळाला तर फोन करत जा. शिक्षकासोबतही फोनवर बोलू शकतेस. सुट्टीपूर्वी नक्की मला भेटायला ये आणि प्रेम करत असशील तर नक्की येशील. जर मी तुला 8 वाजता बोलावले तर तू लवकर शाळेत येऊ शकतेस. येणार असशील तर मला सांग. तुझ्यासोबत खूप काही बोलायचे आहे. तुझ्याजवळ बसून एकमेकांना आपलंस करून आयुष्यभरासाठी तुझे व्हायचे आहे. मी कायमच तुझ्यावर प्रेम करेन. पत्र वाचून फाडून टाक आणि कुणालाही दाखवू नकोस," असे शिक्षकाने विद्यार्थिनीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशTeacherशिक्षकStudentविद्यार्थी