आश्रमात घुसून साध्वीवर बलात्कार, खोलीबाहेर खेचून दिली जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 19:17 IST2020-09-09T19:16:58+5:302020-09-09T19:17:31+5:30
दीपक राणा आणि एका आशिष राणा यांच्यासह चारजण मध्यरात्री २.१५ सुमारास आश्रमात घुसले. नंतर दीपक आणि आशिषने तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी तिला आपल्या खोलीबाहेर खेचले होते आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप साध्वीने केला.

आश्रमात घुसून साध्वीवर बलात्कार, खोलीबाहेर खेचून दिली जीवे मारण्याची धमकी
झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा 46 वर्षीय साध्वीवर आश्रमात बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोप असलेल्या चौघांपैकी एकाला मंगळवारी अटक करण्यात आली आहे, तर अन्य तीन आरोपींना पकडण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या आरोपीचे नाव दीपक राणा (वय 22) असे असून त्याने पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केला आहे.
मुफस्सिल पोलीस ठाण्यामध्ये साध्वीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे दोन अज्ञात पुरुषांसह चार जणांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. गोड्डा पोलिस अधीक्षक वाय.एस. रमेश म्हणाले, “या प्रकरणात सखोल चौकशी सुरू आहे. सर्व फॉरेन्सिक पुरावे गोळा केले गेले आहेत आणि विशेष फॉरेन्सिक टीम बोलाविण्यात आली आहे, असे पुढे रमेश म्हणाले.
मुफस्सिल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ज्योतिष जयस्वाल यांनी बलात्कार पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत सांगितले की, दीपक राणा आणि एका आशिष राणा यांच्यासह चारजण मध्यरात्री २.१५ सुमारास आश्रमात घुसले. नंतर दीपक आणि आशिषने तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी तिला आपल्या खोलीबाहेर खेचले होते आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप साध्वीने केला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार
‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’
लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक