डॉक्टर तरुणीवर बलात्कार; त्यानंतर तिच्याच आई- वडिलांना पाठवला व्हिडिओ, औरंगाबादमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 11:06 IST2021-09-24T09:11:14+5:302021-09-24T11:06:13+5:30
वर्गमैत्रिणीने लग्नात तरुणीची तिचा नातेवाईक अजहर शेख याच्यासह त्याची आई व बहिणीची ओळख करून दिली.

डॉक्टर तरुणीवर बलात्कार; त्यानंतर तिच्याच आई- वडिलांना पाठवला व्हिडिओ, औरंगाबादमधील प्रकार
औरंगाबाद : वर्गमैत्रिणीच्या लग्नात ओळख झाल्यानंतर एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केला. त्याच कालावधीत काढलेले आक्षेपार्ह छायाचित्रे व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने १० लाख रुपयांची खंडणी मागितली. याविषयी पीडित तरुणीने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव अजहर अश्फाक शेख (रा. घाटकोपर वेस्ट, मुंबई) असून त्यास ओसामा खान व हमजा पठाण यांनी मदत केली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार पीडित तरुणीचे बीडीएसचे शिक्षण झाले असून, ती एका खाजगी दवाखान्यात प्रॅक्टिस करते.
वर्गमैत्रिणीने लग्नात तरुणीची तिचा नातेवाईक अजहर शेख याच्यासह त्याची आई व बहिणीची ओळख करून दिली. तेव्हा त्याने एका विमान कंपनीत मुंबई येथे नोकरीला असल्याचे सांगितले. त्याने पहिल्याच भेटी तू आवडत असून आपण लग्न करू, अशी गळ घातली. लवकरच सौदी एअरलाइन्समध्ये नोकरी लागणार असून, आपण जेद्दा येथे स्थायिक होऊ, असेही आमिष दाखविले. यातून त्यांची मैत्री वाढत गेली.
३५ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण; आरोपीसह १९ वर्षीय मुलीनेही तिच्यासोबत नको तो प्रकार केला! https://t.co/Pp7qVV3NcR
— Lokmat (@MiLOKMAT) September 19, 2021
आरोपीने २१ नोव्हेंबर २०२० रोजी औरंगाबादेत एका हॉटेलवर भेटण्यास बोलावून बळजबरीने अत्याचार केला. त्यावेळी खोलीत तिचे अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ काढले व ते व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने ९, १० जानेवारी, १ व २२ फेब्रुवारी २०२१ रोजी विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही, तर तिच्या आई - वडिलांच्या मोबाईलवर तिची छायाचित्रे व व्हिडिओ पाठवून १० लाख रुपयांची मागणी केली. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून बलात्कार, खंडणीसह इतर गुन्हे दाखल केले आहेत.