बलात्काराचे सत्र सुरूच; नांदेडमध्ये आखाड्यावरील साल गड्याच्या पत्नीवर दोघांचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:22 IST2019-12-06T12:15:57+5:302019-12-06T12:22:39+5:30

यावेळी महिलेने आरडा ओरड केल्याने आरोपी फरार

Rape on the wife of farm worker on the agri field in Nanded | बलात्काराचे सत्र सुरूच; नांदेडमध्ये आखाड्यावरील साल गड्याच्या पत्नीवर दोघांचा अत्याचार

बलात्काराचे सत्र सुरूच; नांदेडमध्ये आखाड्यावरील साल गड्याच्या पत्नीवर दोघांचा अत्याचार

ठळक मुद्देरात्री १ वाजताच्या सुमारास महिलेला अत्याचार

नांदेड-  साल गड्याच्या पत्नीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना ४ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत दोघविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

लिंबगाव हद्दीत एका शेतातील अखाडयावर पीडित महिलेचा पती सालगडी म्हणून काम करीत होते. तर महिला एका धाब्यावर स्वयंपाकाचे काम  करीत होत्या . दरम्यान ४ डिसेंबर रोजी मध्यरात्री सदर पीडित महिला रात्री घरी येऊन आखाड्यावर कुटुंबासह झोपली होती.रात्री १ वाजताच्या सुमारास महिला बाहेर आली असता अरविंद जाधव व लखन मोटे या दोघांनी संगनमत करून त्या महिलेला जबरदस्ती आखाड्याशेजारी असलेल्या खोलीत नेले. या ठिकाणी तिचे तोंड दाबून आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. 

यावेळी महिलेने आरडा ओरड केल्याने तिचा पती बाहेर आला. त्यामुळे आरोपी फरार झाले. याप्रकरणी सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि पल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी गोटके हे करीत आहेत.

Web Title: Rape on the wife of farm worker on the agri field in Nanded