सार्वजनिक शौचालयात महिलेवर बलात्कार; यूपीतील रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 14:36 IST2022-03-21T14:35:07+5:302022-03-21T14:36:31+5:30

Rape Case : ही घटना 19 मार्च रोजी घडली होती. या संदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Rape of a woman in a public toilet; Shocking type at the railway station in UP | सार्वजनिक शौचालयात महिलेवर बलात्कार; यूपीतील रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

सार्वजनिक शौचालयात महिलेवर बलात्कार; यूपीतील रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

प्रतापगढ रेल्वे स्थानकावरील पार्किंग स्टँडजवळील सार्वजनिक शौचालयात एका २० वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी मिळाली. ही घटना 19 मार्च रोजी घडली होती. या संदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

कोतवाली पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) आर एन राय यांनी सांगितले की, ही घटना घडली तेव्हा पीडित महिला तिच्या पतीसह ट्रेन पकडण्यासाठी थांबली होती. "सकाळी महिलेला एकटे सोडून नवरा चहा घ्यायला गेला. तेव्हा अण्णा नावाचा आरोपी महिलेकडे आला आणि तिला एक चावी दिली आणि ती पार्किंगजवळ असलेल्या स्वच्छ शौचालयात जाऊ शकते असे त्याने तिला सांगितले. महिला शौचालयात गेल्यावर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पतीने पत्नीची सुटका करून पोलिसांना माहिती दिली.
"महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, आम्ही आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा (कलम 376 आयपीसी) दाखल केला आहे. आरोपीला शोधण्यासाठी आणि अटक करण्यासाठी दोन पथकांवर दबाव आणण्यात आला आहे," एसएचओ म्हणाले.

Web Title: Rape of a woman in a public toilet; Shocking type at the railway station in UP