शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

१८ महिलांवर बलात्कार, २१५ जणांची शिक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 08:55 IST

तामिळनाडू राज्याने सीबीआय चौकशीविरोधात अपील दाखल केले होते, परंतु ते फेटाळण्यात आले.

डॉ. खुशालचंद बाहेतीचेन्नई : तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील वाचथी येथे १९९२ मध्ये घडलेल्या विविध गुन्ह्यांसाठी वन, पोलिस कर्मचारी आणि महसूल अधिकाऱ्यांचे शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळून लावत मद्रास हायकोर्टाने त्यांची शिक्षा कायम केली.

२० जून १९९३ रोजी १५५ वन, १०८ पोलिस आणि ६ महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने वाचथी गावात चंदनाची तस्करी करणारा कुख्यात डाकू वीरप्पनची माहिती मिळवण्यासाठी प्रवेश केला. त्यांनी गावकऱ्यांच्या घरांची नासधूस केली, गुरेढोरे मारली, मारहाण केली आणि १८ महिलांवर बलात्कार केला. या प्रकरणी २६९ जणांविरुद्ध बलात्कार, दंगल आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. १९९५ मध्ये मद्रास कोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. तामिळनाडू राज्याने सीबीआय चौकशीविरोधात अपील दाखल केले होते, परंतु ते फेटाळण्यात आले.

१० लाख द्या बलात्कार पीडितांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. यातील ५० टक्के रक्कम आरोपींकडून वसूल करायची आहे. ३) ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत अशा पीडितांना योग्य रोजगार देण्याचे निर्देशही न्यायालयाने राज्याला दिले आहेत.

कठोर कारवाईचे आदेशn२६९ आरोपींपैकी ५४ आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित १२६ वन, ८४ पोलिस आणि ५ महसूल विभागाचे अधिकारी असे एकूण २१५ जणांना दोषी ठरवण्यात आले. nदोषींमध्ये ४ आयएफएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांनी शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. हे सर्व अपील न्या. पी. वेलमुरुगन यांनी फेटाळले. कोर्टाने तत्कालीन जिल्हाधिकारी, जिल्हा वनाधिकारी, पोलिस अधीक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयChennaiचेन्नईCrime Newsगुन्हेगारी