बकरी चरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीस ओलीस ठेवून केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 20:18 IST2021-08-13T20:16:14+5:302021-08-13T20:18:09+5:30
Rape Case : आरोपीने अल्पवयीन मुलीला बेशुद्ध असल्याचे समजून मारण्याचा प्रयत्नही केला.

बकरी चरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीस ओलीस ठेवून केला बलात्कार
राजस्थानमध्ये बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. बाडमेर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय व्यक्तीने प्रथम मुलीला डोंगरावर नेले, तिथे तिला ओलीस ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने अल्पवयीन मुलीला बेशुद्ध असल्याचे समजून मारण्याचा प्रयत्नही केला.
आरोपीने पीडितेच्या गळ्याला दोरी लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याचे वाटले आणि आरोपी पळून गेला. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. महिला सेलच्या उपअधीक्षक सीमा चोप्रा यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.
पुढे ते म्हणाले, 'अल्पवयीन पीडितेवर बलात्काराची घटना समोर आली आहे. वडिलांच्या तक्रारीनुसार, अल्पवयीन बकरी चरायला गेली होती. दरम्यान, ४० वर्षीय भोपाळ सिंगने तिला ओलीस ठेवले आणि डोंगरावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून पीडितेची वैद्यकीय चाचणी केली आहे. पालकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.
घातपाताची शक्यता! मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर पेट्रोलने भरलेली बाटली फेकल्याने खळबळhttps://t.co/vMdOde8kei
— Lokmat (@MiLOKMAT) August 13, 2021
पीडित मुलगी बकरी चरायला गेली होती
पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. ती नेहमीप्रमाणे बकरी चरायला गेली होती. या दरम्यान आरोपीने तिला जबरदस्तीने ओलीस ठेवले. या दरम्यान पीडितेने विरोध केला. आरोपीने पीडितेवर बलात्कार केला, त्यानंतर तिला सोडून पळून गेला.