रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:10 IST2025-11-10T11:08:53+5:302025-11-10T11:10:20+5:30
पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
मध्य प्रदेशातील इंदौरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका २१ वर्षीय युवतीने, इरफान अली उर्फ हैप्पी अली उर्फ हैप्पी पंजाबीवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्ती गर्भपात केल्याचे गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. विजयनगर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
संबंधित पीडित तरुणी मुळची राजस्थानची रहिवासी आहे, ती निपानिया येथे भाड्याच्या घरात राहत होती आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, "मे २०२३ मध्ये आरोपीने 'हैप्पी पंजाबी' असे नाव सांगून स्वतःची ओळख करून दिली. यानंतर, नोकरीचे आमिष दाखवून तिला एका हॉटेलवर बोलावले आणि कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ टाकून बेशुद्ध केले. जेव्हा सकाळी जाग आली, तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचे तिच्या लक्षात आले. याचा विरोध केल्यानंतर, हॅप्पी म्हणाला, तुझे अश्लील फोटो आणि व्हिडिओही तयार केले आहेत. यानंतर तो तिला ब्लॅकमेल करू लागला. तिच्या रूमवर जाऊन, तिला ते फोटो आणि व्हिडिओ दाखवून धमकावू लागला आणि वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला."
पीडितेने पुढे म्हटले म्हटले आहे की, २०२४ मध्ये हॅप्पी मला कुठे तरी घेऊन जात होता. दरम्यान, विजयनगर भागात आरोपीचा एका ऑटो चालकाशी वाद झाला. तेव्हा त्याची खरी ओळख इरफान असल्याचे मला समजले. विरोध केला असता तो म्हणाला, 'मी मुस्लीम आहे, तुलाही मुसलमान व्हावे लागेल.' या प्रकरणानंतर, यानंतर पीडिता राजस्थानला गेली, पण जानेवारी २०२५ मध्ये इंदौरला परतल्यावर पुन्हा ब्लॅकमेलिंग आणि धार्म बदलण्यासंदर्भात दबाव सुरू झाला.
जून २०२५ मध्ये आरोपीने तिला देवास येथे एकांत फ्लॅटमध्ये कैद करून अनेकदा बलात्कार केला, यामुळे ती गर्भवती झाली. नंतर जबरदस्ती औषध देऊन गर्भपात करवला, यामुळे तिची तब्येतही खालावली. त्याने ऑक्टोबर २०२५ मध्ये तिच्यावर शेवटचा बलात्कार केला. समाजाच्या भीतीने तिने आतापर्यंत तक्रार नोंदवली नव्हती. मात्र, कुटुंबीयांना सांगितल्यानंतर, करणी सेनेच्या मदतीने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.
इरफान, कलमा आणि मुस्लिम प्रार्थना (मुस्लीम दुआ) पठण करवत होता. पाठांतर होत नसल्याने मारझोड करायचा. रोजा ठेवण्याचा आणि बुरखा घालण्यास बळजबरी करायचा. नकार दिल्यास, 'तू मला ओळखत नाहीस, जास्त हुशारी केली तर, जीव घेईन', अशी धमकी देत होता. सिगारेटचे चटके, मारहाण, डोक्याला दुखापत आणि हातावर जखमाही आहेत, असेही पीडितेने म्हटले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, इरफान अलीवर १५ हून अधिक गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. त्याला जिल्हा तडीपारही करण्यात आले आहे. त्याच्यावर रासुकाही लावण्यात आला आहे. तो इंदूरमध्ये ड्रग्स पार्ट्या आयोजित करतो आणि अश्लील व्हिडिओ बनवून निर्दोष मुलींना ब्लॅकमेल करतो. त्याच्यावर बलात्कार, ब्लॅकमेलिंग, जबरदस्ती धर्मांतर करण्यासाठी दबाव आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.