शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

मडगाव न्यायालयातून पळालेल्या रामचंद्रनला सहा महिन्याची कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 17:30 IST

ब्रिटीश महिलेवर बलात्काराच्या गुन्ह्याअंतर्गत अटक : सुनावणीस आणले असता झाला फरार

ठळक मुद्दे 17 जुलै रोजी मडगाव पोलिसांनी त्याला बंगळुरु येथून अटक करुन पुन्हा गोव्यात आणले होते. सध्या या आरोपीवर काणकोण तसेच पेडणे येथील गुन्हय़ासंदर्भात सुनावणी चालू आहे.

मडगाव - बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात आणले असता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या आणि मागाहून अटक करण्यात आलेल्या रामचंद्रन चंद्रयल्लप्पा या संशयिताला मडगाव न्यायालयाने कोठडीतून फरार झाल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून सहा महिन्याच्या कैदेची शिक्षा ठोठावली. मूळ तामिळनाडू येथील या संशयिताला मागच्यावर्षी पाळोळे-काणकोण येथे एका ब्रिटीश महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी शाहीर इसानी यांनी ही शिक्षा ठोठावली. 28 जून रोजी सदर आरोपीला मडगाव न्यायालयात सुनावणीसाठी आणले असता शौचाचे निमित्त करुन न्यायालयाच्या खालच्या मजल्यावरील शौचालयात जाऊन नंतर खिडकीचे ग्रील उखडून पळून गेला होता. त्यानंतर 17 जुलै रोजी मडगाव पोलिसांनी त्याला बंगळुरु येथून अटक करुन पुन्हा गोव्यात आणले होते.

मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात पहाटेच्या दरम्यान काणकोण रेल्वे स्थानकावर आपल्या मैत्रिणीला सोडायला आलेल्या एका ब्रिटीश महिलेवर सदर आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप होता. त्यानंतर त्याने या महिलेकडील मौल्यवान वस्तू घेऊन रेल्वेने पळ काढला होता. मात्र हा गुन्हा करताना त्याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर टिपली गेल्याने त्या छबीच्या आधाराने त्याला मडगाव रेल्वे स्थानकावर उतरल्यावर अटक केली होती. सदर संशयित तामिळनाडूतील एका चोरटय़ांच्या टोळीचा सदस्य होता. हा बलात्कार करण्यापूर्वी त्याने व त्याच्या इतर साथीदारांनी पेडणे तालुक्यात पर्यटकांना लुटून मडगाव गाठले होते. मडगावहून ते आपल्या गावात पलायन करण्याच्या तयारीत असताना त्या टोळीला अटक झाली होती. सध्या या आरोपीवर काणकोण तसेच पेडणे येथील गुन्हय़ासंदर्भात सुनावणी चालू आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCourtन्यायालयArrestअटकgoaगोवा