Rakesh, Sarang Wadhwan's police custody extended in PMC bank scam | PMC घोटाळ्यातील अटक राकेश, सारंग वाधवान यांच्या कोठडीत वाढ

PMC घोटाळ्यातील अटक राकेश, सारंग वाधवान यांच्या कोठडीत वाढ

ठळक मुद्दे. पीएमसी घोटाळ्याप्रकरणातील प्रमुख आरोपी आणि बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस कांजिराथिंनगल पाठोपाठ बँकेचे माजी अध्यक्ष वरियमसिंग कर्तारसिंग यांना अटक करण्यात आलीजॉयने ३ वर्षे लपवून ठेवल्याने त्याचा हेतू यातून स्पष्ट होत असल्याचेही पोलिसांनी यावेळी नमूद केले.

मुंबई - पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केलेल्या राकेश आणि सारंग वाधवान यांच्या पोलीस कोठडीत १६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पीएमसी घोटाळ्याप्रकरणातील प्रमुख आरोपी आणि बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस कांजिराथिंनगल पाठोपाठ बँकेचे माजी अध्यक्ष वरियमसिंग कर्तारसिंग यांना अटक करण्यात आली, तर जॉयला १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तसेच आज वरियमसिंगला सुद्धा कोर्टात हजार केले असता १६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

जॉयला या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असून, त्याच्या चौकशीतून पीएमसी आणि एचडीआयएलमधील ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्यासंबंधी महत्त्वाचे पुरावे हाती लागू शकतात, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली होती. यात एचडीआयएलसोबत झालेले व्यवहार, कर्जाबाबत जॉयकडे अधिक चौकशी करणे सुरु आहे. शिवाय, बँकेकडून देण्यात आलेल्या कर्जाचा दुरुपयोग झाल्याचे दिसून येत आहे. या व्यवहाराची माहिती जॉयने ३ वर्षे लपवून ठेवल्याने त्याचा हेतू यातून स्पष्ट होत असल्याचेही पोलिसांनी यावेळी नमूद केले.

Web Title: Rakesh, Sarang Wadhwan's police custody extended in PMC bank scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.