शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान हादरले! रस्ता चुकलेल्या प्रवासी बसचा वीजेच्या तारेला स्पर्श; 6 जणांचा मृत्यू, काही भाजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 07:57 IST

Bus accident : बस रस्ता चुकल्याने गावामध्ये आली होती. महेशपुराचे रहिवासी घनश्याम सिंह यांनी सांगितले की, ही बस मांडोलीहून ब्यावरसाठी निगाली होती. मात्र, रात्री रस्ता चुकली. यामुळे ही बस महेशपुरा गावात आली होती.

राजस्थानमध्ये विचित्र आणि तेवढीच भयावह दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री एक आराम बस विद्युतभारीत तारेच्या संपर्कात आल्याने बसमध्ये विद्युत प्रवाह पसरला. यामध्ये सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जवळपास २० हून अधिक प्रवासी होरपळले आहेत. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हा हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस पी शर्मा यांनी ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हा अपघात जालौर जिल्ह्याच्या महेशपुरा गावामध्ये झाला. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जोधपूरला पाठविण्यात आले आहे. तसेच १३ जणांवर जिल्हा हॉस्पिटलमध्येच उपचार सुरु आहेत. बस रस्ता चुकल्याने गावामध्ये आली होती. महेशपुराचे रहिवासी घनश्याम सिंह यांनी सांगितले की, ही बस मांडोलीहून ब्यावरसाठी निगाली होती. मात्र, रात्री रस्ता चुकली. यामुळे ही बस महेशपुरा गावात आली होती. गावातील ११ केव्हीच्या विद्युतभारीत तारेला बसच्या टपाचा स्पर्श झाला. यामुळे बसला आग लागली. तसेच वीजही प्रवाही झाली. 

स्थानिकांनी वीज वितरण विभागाला माहिती देत वीज बंद करायला लावली. यानंतर लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पोलिसांनाही बोलावले. 

खासदार देवजी पटेल यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसRajasthanराजस्थानelectricityवीज