सारखी आजारी असायची अन् स्वतःचीच मर्जी चालवायची; पोटात ३ महिन्यांचे बाळ असताना पत्नीसोबत पतीचं क्रूर कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 10:26 IST2026-03-24T10:13:22+5:302026-03-24T10:26:00+5:30

राजस्थानमध्ये एका नराधम पतीने गर्भवती पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Rajasthan Horror Husband Smashes Pregnant Wife Head with Stone 48 Hour Blind Murder Solved | सारखी आजारी असायची अन् स्वतःचीच मर्जी चालवायची; पोटात ३ महिन्यांचे बाळ असताना पत्नीसोबत पतीचं क्रूर कृत्य

सारखी आजारी असायची अन् स्वतःचीच मर्जी चालवायची; पोटात ३ महिन्यांचे बाळ असताना पत्नीसोबत पतीचं क्रूर कृत्य

Rajasthan Crime: प्रेमविवाह करून सुखाचा संसार मांडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका महिलेचा तिच्याच पतीने अत्यंत निर्घृणपणे अंत केला. राजस्थानच्या खैरथल-तिजारा जिल्ह्यातील भिवाडीमध्ये एका पतीने आपल्या ३ महिन्यांच्या गरोदर पत्नीची दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या ४८ तासांत भिवाडी पोलिसांनी या ब्लाइंड मर्डर केसचा छडा लावत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

डोंगरदरीत सापडला रक्ताने माखलेला मृतदेह

२१ मार्च २०२६ रोजी गोधानच्या डोंगरदरीत एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर तपासाअंती ही महिला गुलफ्सा (३२) असल्याचे समोर आले. ती पती नदीमसोबत भिवाडीतील सोनू कॉलनी परिसरात राहत होती.

'चला फिरायला जाऊया' असं सांगून नेलं डोंगरदरीत

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, गुलफ्सा आणि तिचा पती नदीम एकत्र डोंगराच्या दिशेने जाताना दिसले. मात्र, परतताना नदीम एकटाच होता. संशयावरून पोलिसांनी उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. "गुलफ्सा खूप जिद्दी होती आणि तिच्या आजारपणामुळे मी त्रस्त झालो होतो, म्हणून तिला संपवले," असे त्याने सांगितले.

"आजारी होती आणि स्वतःचीच मर्जी चालवायची"

नदीमने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ५ वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर गुलफ्साला पाठीच्या कण्याचा आजार आणि टीबी झाला होता. तिच्या उपचारावर मोठा खर्च होत होता. त्यातच ती पतीला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी हट्ट करायची. तिने यापूर्वी हुंड्याचा खोटा गुन्हा दाखल करून नदीमला तुरुंगात पाठवले होते. ईदच्या दिवशीही त्यांच्यात जोरदार भांडण झाले, त्यानंतर नदीमने तिला संपवण्याचा प्लॅन आखला.

पोटात होतं ३ महिन्यांचं बाळ; माहेरच्यांचे गंभीर आरोप

गुलफ्साच्या नातेवाईकांनी सांगितले की, ती ३ महिन्यांची गरोदर होती. नदीमने केवळ पत्नीचीच नाही, तर आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाचीही हत्या केली आहे. नातेवाईकांच्या मते, नदीम लग्नानंतर सतत हुंड्यासाठी तिचा छळ करायचा आणि तिला सोडून वारंवार पळून जायचा. १९ फेब्रुवारीलाच तो तिला भिवाडीला घेऊन आला होता आणि तिथेच त्याने तिचा काटा काढला.

पोलिसांची ४८ तासांत कामगिरी

पोलिसांनी सांगितले की, तांत्रिक तपासाच्या आधारे आम्ही आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली. आरोपीने अत्यंत क्रूरपणे दगडाने पत्नीचे डोके ठेचले होते. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title : राजस्थान: ज़िद्दी पत्नी, बीमारी और दहेज के लिए गर्भवती पत्नी की हत्या

Web Summary : राजस्थान में एक व्यक्ति ने अपनी गर्भवती पत्नी गुलफ्सा की लगातार बहस और दहेज की मांग के बाद हत्या कर दी। उसने दावा किया कि वह जिद्दी थी, अक्सर बीमार रहती थी, और पहले उसके खिलाफ झूठा दहेज का मामला दर्ज कराया था। पुलिस ने 48 घंटे के भीतर पति को गिरफ्तार कर लिया।

Web Title : Rajasthan Man Murders Pregnant Wife Over Stubbornness, Illness, Dowry Demands.

Web Summary : In Rajasthan, a man murdered his pregnant wife, Gulfsa, after constant arguments and dowry demands. He claimed she was stubborn, often ill, and had previously filed a false dowry case against him. Police arrested the husband within 48 hours.