धक्कादायक! बहिणीला मारत होता भावोजी, मेहुण्याने त्याच्या बहिणीवर केला रेप; नातेवाईकांना पाठवला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 17:45 IST2021-10-28T17:44:01+5:302021-10-28T17:45:02+5:30
Rajasthan Crime News : पोलिसांनी उत्तर प्रदेशात राहणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या साथीदाराला रेप करणे व अश्लील व्हिडीओ बनवण्याच्या आरोपात अटक केली.

धक्कादायक! बहिणीला मारत होता भावोजी, मेहुण्याने त्याच्या बहिणीवर केला रेप; नातेवाईकांना पाठवला व्हिडीओ
राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूरमध्ये पोलिसांनी एका अशा व्यक्तीला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली, ज्याने भावोजीचा सूड उगवण्यासाठी भावोजीच्या बहिणीसोबत रेप केला आणि त्याचा अश्लील व्हिडीओ बनवला. पोलिसांनी उत्तर प्रदेशात राहणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या साथीदाराला रेप करणे व अश्लील व्हिडीओ बनवण्याच्या आरोपात अटक केली.
पोलिसांनुसार, आरोपीचा भावोजी त्याच्या बहिणीला त्रास देत होता. पती आपल्या पत्नीला त्रास देत होता, तिच्यासोबत मारहाण करत होता. त्यामुळे त्याने दाजी म्हणजे भावोजीवर सूड उगवण्यासाठी भावोजीच्या बहिणीला फसवून, गोड बोलून एका हॉटेलवर घेऊन गेला. तिथे साथीदारासोबत मिळून तिच्यासोबत रेप केला आणि त्याचा व्हिडीओ बनवून नातेवाईकांना पाठवून दिला.
ही घटना मथुरा गेट पोलीस स्टेशन भागातील आहे. जिथे एका महिलेने तक्रार दाखल केली होती की, वहिणीचा भाऊ त्याच्या मित्रासोबत मिळून मला हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि तिथे माझ्यासोबत रेप केला. त्यानंतर अश्लील व्हिडीओ बनवून नातेवाईकांना पाठवून दिला.
पोलीस म्हणाले की, एका तक्रार दाखल झाली होती ज्यात एका महिलेसोबत एका व्यक्तीने त्याच्या साथीदारासोबत मिळून हॉटेलमध्ये रेप केला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.