राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:01 IST2025-06-11T16:00:11+5:302025-06-11T16:01:37+5:30

Raja Raghuwanshi Murder Case: सोनमच्या भावाने राजाच्या आईचे पाय पकडून माफी मागितली; बहिणीशी सर्व संबंधही तोडले.

Raja Raghuwanshi Murder Case: Accused Sonam's brother went to Raja Raghuwanshi's house, said- Hang my sister | राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....

राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....

Raja Raghuwanshi Murder Case: मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी हत्याकांडाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. पत्नी सोनमनेच प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या करुन मृतदेह दरीत फेकल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, आपल्या बहिणीनेच पतीची हत्या केल्याचे समोर आल्यानंतर सोनमचा भाऊ गोविंद पश्चात्ताप करण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी इंदूर येथील राजाच्या घरी पोहोचला. 

याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात राजाच्या आईला पाहताच गोविंद ढसाढसा रडताना दिसतोय. तसेच, मी सोनमशी सर्व संबंध तोडले आहेत. राजा मला खूप प्रिय होता. या कुटुंबाने आपला मुलगा गमावला आहे, आता मी त्यांच्यासोबत आहे. माझ्या बहिणीचा या घटनेत हात आहे, त्यामुळे तिच्यासह सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी त्याने मीडियासमोर केली. 

विपिन रघुवंशीचा खुलासा
मेघालय पोलिसांनी सोनम, राज कुशवाह आणि तीन कॉन्ट्रॅक्ट किलर आकाश राजपूत, विशाल उर्फ ​​विकी ठाकूर आणि आनंद कुर्मी यांना अटक केली आहे, परंतु गोविंदच्या भूमिकेबद्दल कोणतेही पुरावे सापडले नाहीत. दरम्यान, पीडित राजाचा भाऊ विपिन रघुवंशी याने दावा केला की, गोविंद मंगळवारीच इंदूरला आला होता, त्याला हत्येची कोणतीही माहिती नव्हती. विपिननेच गोविंदला माध्यमांसमोर आणले आणि त्याची बाजू ऐकून घेतली. 

आरोपी सोनमचा कबुलनामा
मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशी हत्येच्या तपासात मोठा खुलासा केला. पोलिसांनी आरोपी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह, दोघांना समोरासमोर आणून चौकशी केली. सर्व  सीसीटीव्ही फुटेज, रक्ताने माखलेले कपडे आणि अन्य पुरावे समोर ठेवले. पुराव्याच्या दबावामुळे सोनमने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. राज कुशवाह आणि 3 सुपारी किलर्स आकाश राजपूत, विशाल ठाकूर, आनंद कुर्मी यांच्यासोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचल्याचे तिने सांगितले.
 

Web Title: Raja Raghuwanshi Murder Case: Accused Sonam's brother went to Raja Raghuwanshi's house, said- Hang my sister