शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
4
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
5
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
6
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
7
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
8
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
9
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
10
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
11
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
12
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
13
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
14
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
15
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
16
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
17
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
18
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
19
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
20
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:08 IST

Raja-Sonam Raghuvanshi Case: या प्लॅनिंगवेळी सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाह मेघालयला जाण्याऐवजी इथेच इंदूरमध्ये थांबला.

इंदूर - राजा रघुवंशी हत्या प्रकरणात त्याची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाह यांनी संपूर्ण प्लॅनिंग केल्याचे उघड झाले. राजाची हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती असं तपासात पुढे आले परंतु त्यानंतर हत्येत सहभागी ३ जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नसून राज कुशवाहचे मित्र असल्याचे समोर आले.

मित्रांना हत्येसाठी कसं तयार केले?

माहितीनुसार, १६ मे रोजी राजने हत्येचे षडयंत्र रचलं आणि इंदूरच्या एका कॅफेमध्ये त्याच्या बालपणीच्या तीन मित्रांची भेट घेतली. त्याने मित्रांना हत्येसाठी पैशाचं आमिष दिले होते. राजने त्याच्या तिन्ही मित्रांना २० मे रोजी मेघालयला पाठवले जेव्हा सोनम आणि तिचा पती राजा रघुवंशी हनीमूनसाठी रवाना झाले होते.  

मित्रांनी केला मर्डर

या प्लॅनिंगवेळी सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाह मेघालयला जाण्याऐवजी इथेच इंदूरमध्ये थांबला. शिलांग पोलिसांच्या माहितीनुसार राजने पडद्यामागून हत्याकांड घडवून आणला. तो सातत्याने सोनमच्या संपर्कात होता. हत्येदिवशी सोनम तिच्या पतीला घेऊन एका निर्जनस्थळी घेऊन गेली. जिथे या ३ जणांनी राजा रघुवंशीवर हल्ला केला आणि त्याची हत्या करून मृतदेह दरीत फेकून दिला. 

सर्व आरोपी अटकेत
 
सध्या पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी, हत्येचा मास्टरमाईंड तिचा प्रियकर राज कुशवाह आणि हत्या घडवून आणणाऱ्या तिघांना अटक केली आहे. शनिवारी रात्री उत्तर प्रदेशातील गाजीपूरला आल्यानंतर सोनमने पोलिसांसमोर सरेंडर केले त्यानंतर इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली. आनंद कुमार, आकाश राजपूत, विक्की उर्फ विशाल ठाकूर असं या आरोपींची नावे आहेत. हे सर्व मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. आनंद कुमारला उत्तर प्रदेशच्या बिना जिल्हा, आकाश राजपूतला ललितपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली तर विक्की ठाकूरला इंदूरमध्ये अटक केली आहे.

लग्नाच्या १७ दिवसांनीच पतीला संपवले

सोनम आणि राजा यांचे लग्न ११ मे रोजी पार पडले होते. त्यानंतर दोघंही हनिमूनसाठी शिलाँगला गेले. मात्र २ जून रोजी, राजाचा मृतदेह एका दरीजवळील खड्ड्यात सापडला. त्यानंतर सोनमने मेघालय सोडून इंदूर गाठलं आणि तिथे भाड्याच्या घरात वास्तव्य केलं. काही काळाने ती गाजीपूरकडे रवाना झाली, जिथे तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी