Video : राज कुंद्राचा पार्टनर, सुशांतचा मित्र कुणाल जानीनं आर्यनची टीप NCBला दिली?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 10:17 PM2021-10-24T22:17:23+5:302021-10-24T22:19:00+5:30

Aryan Khan : खोचक प्रतिक्रिया देत भाजपा नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांना व्हिडीओ डिलीट करू नका आणि काळ्या कपड्यातील व्यक्ती कोण असा सवाल विचारला आहे. 

Raj Kundra's partner, Sushant's friend Kunal Jani gave Aryan's tip to NCB? | Video : राज कुंद्राचा पार्टनर, सुशांतचा मित्र कुणाल जानीनं आर्यनची टीप NCBला दिली?

Video : राज कुंद्राचा पार्टनर, सुशांतचा मित्र कुणाल जानीनं आर्यनची टीप NCBला दिली?

Next
ठळक मुद्देएनसीबी कार्यालयात बसणारी ही व्यक्ती कुणाल जानीच होती, अशी चर्चा सुरु झाली आहे.

आर्यन खानसह, किरण गोसावी आणि काळ्या कपड्यातील व्यक्तीचा एनसीबी ऑफिसमधला एक नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत किरण गोसावी हा आर्यनचं कुणाशीतरी फोनवरुन बोलणं करुन देताना दिसत आहे. त्याच व्हिडिओत आणखी एक व्यक्ती काळ्या कपड्यात दिसतोय, जो खुर्चीवर अगदी आरामात बसला आहे. ही व्यक्ती कुणाल जानीसारखी दिसते आहे. हा व्हिडीओ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. त्यावर खोचक प्रतिक्रिया देत भाजपा नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांना व्हिडीओ डिलीट करू नका आणि काळ्या कपड्यातील व्यक्ती कोण असा सवाल विचारला आहे. 

कुणाल जानी ही तीच व्यक्ती जी सुशांत सिंह प्रकरणात जेलमध्ये गेली होती. तसेच शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची बिझनेस पार्टनर आहे. हा व्यक्ती एनसीबी कार्यालयात काय करत होता? कुणाल जानी नेमका कोण आहे?, कुणाल जानीचं तिथे असणं याचा अर्थ काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एनसीबी कार्यालयात बसणारी ही व्यक्ती कुणाल जानीच होती, अशी चर्चा सुरु झाली आहे. कुणाल जानीचं वांद्र्यात एक हॉटेल आहे. तो अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र आहे. एनसीबीनं त्याला अटकही केली होती, सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्तीला ड्रग्स पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता. दोनच आठवड्यांपूर्वी त्याला विशेष NDPS कोर्टानं जामिन मंजूर केला होता. सुशांत-रिया प्रकरणात कुणाल जानीचे व्हॉट्सअप चॅट एनसीबीला मिळाले होते. यात तो कोकेनचा उल्लेख करताना मिळाला, असा एनसीबीनं आरोप लावला होता. इतकंच नाही तर कुणाल जानी ड्रग पेटलर्स आणि ग्राहक यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावत होता, असाही आरोप करण्यात आला होता. 

कोण आहे कुणाल जानी ?

कुणाल जानीला एनसीबीनं अटक केली होती, रिया चक्रवर्तीच्या भावासह त्याला अटक झाली होती. आता फक्त सुशांत सिंहचा मित्र इतकीच जानीची ओळख नाही. शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याच्याशीही जानीचा जवळचा संबंध आहे. कुंद्रा सध्या पॉर्न प्रकरणात जामिनावर आहे. राज कुंद्रा आणि कुणाल जानी हे दोघे बिझनेस पार्टनर्स आहेत. राज कुंद्रा आणि कुणाल जानी हे दोघेही वांद्र्याच्या बॅस्टिअन रेस्टॉरंटचे डायरेक्टर आहेत. 

आता हाच कुणाल जानी आर्यन खानला अटक केली तेव्हा एनसीबीच्या ऑफिसमध्ये होता या चर्चेला उधाण आलंय. त्यातच भाजपचे नेते मोहीत भारतीय यांनीदेखील या व्यक्तीचा फोटो ट्विट केलाय. इतकच नाही तर कुणाल जानीचा खुद्द शाहरुखसोबतचाही फोटो ट्विट केलाय. नवाब मलिकांच्या सत्यमेव जयते या ट्विटला त्यांनी रिट्विट केलंय आणि हे दोन फोटो शेअर केलेत.
आता कुणाल जानी एनसीबी ऑफिसमध्ये होता हे जर खरं असेल तर यामागे खूप मोठा अर्थ आहे. कुणाल जानी याच्यावर ड्रग पेडलर्सशी संबंध असल्याचे आरोप आहेत. त्यासाठी तो जेलमध्येही गेला होता. आता कुणाल जानी एनसीबी ऑफिसमध्ये आर्यन खानला अटक केली तेव्हा होता म्हणजे आर्यन प्रकरणाची टीप एनसीबीला कुणाल जानीनंच दिली होती का असा संशय येत आहे. कुणाल जानीनं एनसीबीसोबत हातमिळवणी करत ड्रग्स पेडलर्सचा पर्दाफाश करायचं ठरवलंय का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती ही कुणाल जानीसारखी दिसत असली तरी ती व्यक्ती कुणाल जानीच आहे. याबाबत पुष्टी लोकमत करत नाही. 

 

Web Title: Raj Kundra's partner, Sushant's friend Kunal Jani gave Aryan's tip to NCB?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app