शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मुंबई विमानतळ घोटाळ्यात ‘जीव्हीके’च्या ठिकाणांवर छापे; रेड्डी पितापुत्रावर सीबीआयकडून गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 4:36 AM

2017-18 मध्ये 9 कंपन्यांच्या नावे बनावट कार्य कंत्राटे दाखवून 310 कोटी रुपये पळविण्यात आले. जीव्हीके समूहाला बेकायदेशीरीत्या 395 कोटींचे अर्थसाह्य' देण्यात आले.

मुंबई/नवी दिल्ली : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कारभारात ७०५ कोटी रुपयांच्या अनियमितता आढळल्याने जीव्हीके उद्योग समूहाचे चेअरमन वेंकट कृष्णा रेड्डी गणपती व त्यांचे पुत्र जी. व्ही. संजय रेड्डी यांच्याविरूद्ध सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. सीबीआयने बुधवारी रात्री समूहाच्या मुंबई व हैदराबाद ठिकाणांवर छापे मारले.

जीव्हीके एअरपोर्ट व एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी यांच्या एमआयएएलद्वारे सरकारी-खासगी भागीदारीत विमानतळ चालविले जाते. वाढीव खर्च, कमी महसूल व रेकॉर्डमध्ये हेराफेरी या मार्गांनी जीव्हीकेने ७०५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. वेंकट कृष्णा रेड्डी गणपती ‘एमआयएएल’चेही संचालक असून, पुत्र व्यवस्थापकीय संचालक आहेत. ‘एमआयएएल’मधील पैसा हस्तांतरित करण्यासाठी यांनी नऊ खासगी कंपन्या वापरल्याचे तपासात समोर आले आहे.

अधिकाऱ्यांशी संगनमतजीव्हीके समूहाच्या प्रवर्तकांनी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीच्या अज्ञात अधिकाऱ्यांशी संगनमत करून विविध मार्गांनी पैशाचा अपहार केला. घोटाळ्याचा आकडा ८०५ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे सीबीआयचे म्हणणे आहे. मुंबई विमानतळाचे आधुनिकीकरण, देखभाल-दुरुस्ती व परिचालन यासाठी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीने ४ एप्रिल २००६ मध्ये ‘एमआयएएल’सोबत करार केला होता.2017-18 मध्ये 9 कंपन्यांच्या नावे बनावट कार्य कंत्राटे दाखवून 310 कोटी रुपये पळविण्यात आले. जीव्हीके समूहाला बेकायदेशीरीत्या395 कोटींचे अर्थसाह्य' देण्यात आले.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागAirportविमानतळMumbaiमुंबई