शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई! भारतीय लष्कराची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्पाय नेटवर्कवर छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 21:13 IST

व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (Voip) या तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता.

ठळक मुद्देलष्कराचे एक पथक आणि मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. समीर कादर अल्वारी (३८) असं अटक आरोपीचं नाव असून तो गोवंडी येथील शिवाजी नगर येथे राहणार आहे.

मुंबई - चेंबूर परिसरात बसून टेलिफोन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भारतीय लष्कराची जम्मू -काश्मीरमधली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्पाय नेटवर्कवर छापा टाकण्यात आला आहे. लष्कराचे एक पथक आणि मुंबईपोलिसांच्या क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईत एका व्यक्तीला जेरबंद करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेवरुन भारतीय लष्कराची जम्मू काश्मीरमधील माहिती व सैन्यदलाच्या हालचालींविषयी गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. समीर कादर अल्वारी (३८) असं अटक आरोपीचं नाव असून तो गोवंडी येथील शिवाजी नगर येथे राहणार आहे.व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (Voip) या तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. या छाप्यादरम्यान मुंबई पोलीस आणि लष्कराच्या पथकाने महत्वाच्या गोष्टी जप्त केल्या आहेत. ३ चायनिज सिमकार्ड, याव्यतिरीक्त १९१ सिमकार्ड, लॅपटॉप, मोडेम, अँटेना, बॅटरी आणि कनेक्टर असे सामान हस्तगत करण्यात आले आहे. चायनिज सिमकार्ड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आवाज बदलून व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल या तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतीय लष्कराची माहिती मिळण्याचा प्रयत्न सुरु होता.पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आणि लष्कराने केलेल्या या कारवाईनंतर तपास यंत्रणा याप्रकरणी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा असलेल्या ISI चा सहभाग आहे का याचा तपास करत आहेत. भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जम्मू -काश्मीरमध्येही सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्याचा मोठा कट उधळून लावण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या या कारवाईत खूप मोठे धागेदोरे हाती लागू शकतात. अटक केलेल्या व्यक्तीकडून पोलीस अशा प्रकारची स्पाय नेटवर्क अजून किती ठिकाणी कार्यरत आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. यापूर्वीच अशाच गुन्ह्यात भिवंडी येथील भोईवाडा पोलिसांनी समीर सह पाच जणांना अटक केलेली होती. त्याच गुन्ह्यात समीर हा जामिनावर होता. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. समीरने सिमबॉक्सच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील अनेक कॉल ट्रान्सफर केलेले होते. ते कॉल विदेशातून आल्याचे समोर आल्याने या समीरसह त्याच्या सहकाऱ्यांचे आंतर राष्ट्रीय टोळीशी किंवा दहशतवादी संघटनेशी संधान आहे काय? याचा शोध पोलीस पथक घेत आहे.

 

 

अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल; महिला पोलीस अधिकाऱ्याचा केला होता अपमान

 

धक्कादायक... मुलीच्या वाढदिवशीच बापानं मुलाला ठार मारलं, पोलिसांना कारण सांगितलं!

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसJammu Kashmirजम्मू-काश्मीरMumbaiमुंबई