अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल; महिला पोलीस अधिकाऱ्याचा केला होता अपमान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 04:30 PM2020-05-30T16:30:37+5:302020-05-30T16:51:22+5:30

शर्मा यांच्या विरोधात निदर्शने करून त्यांची बदली करण्याची धमकी देत, त्यांच्याशी व इतर पोलीस अंमलदार यांच्याशी आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला म्हणून  फिर्यादी पोलीस हवालदार रवींद्र नारायण निवासे (५१) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Insult to female police officer by Abu Azmi; Filed a case pda | अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल; महिला पोलीस अधिकाऱ्याचा केला होता अपमान

अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल; महिला पोलीस अधिकाऱ्याचा केला होता अपमान

googlenewsNext
ठळक मुद्देअबू आझमींसह समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल या घटनेनंतर कर्तव्यनिष्ठ शर्मा यांची चेंबूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन, कोरोनाचे प्रादुर्भाव वाढेल असे कृत्य, धमकावणे, शिविगाळ, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, सह कलम २, ३, ४ साथीचे रोग प्रतिबंधक कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - महिला पोलीस अधिकाऱ्याबाबत केलेल चुकीचे वक्तव्य तसेच लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे अबू आझमीसह ३५ ते ४० जणांविरुद्ध अखेर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार नागपाड़ा पोलीस अधिक तपास करत आहेत.

          

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ तारखेला रात्री १२ ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत नागपाडा जंक्शन परिसरात आझमी यांनी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षक शालिनी शर्मा यांनी मजूरांना त्यांचे गावी जाण्यासाठी रेल्वे का दिली नाही म्हणून आंदोलन छेडले. त्यांनी ११ समर्थकांना व ३० ते ३५ इतर इसमांना सोबत घेवुन तोंडावर मास्क न लावता व सोशल डिस्टनसिंग न पाळता बेकायदेशीर जमाव जमवला. आणि शर्मा यांच्या विरोधात निदर्शने करून त्यांची बदली करण्याची धमकी देत, त्यांच्याशी व इतर पोलीस अंमलदार यांच्याशी आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला म्हणून  फिर्यादी पोलीस हवालदार रवींद्र नारायण निवासे (५१) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       

लॉकडाऊनदरम्यान लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन, कोरोनाचे प्रादुर्भाव वाढेल असे कृत्य, धमकावणे, शिविगाळ, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, सह कलम २, ३, ४ साथीचे रोग प्रतिबंधक कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार नागपाड़ा पोलीस अधिक तपास करत आहेत. कामगारांच्या जमावाचा मुद्दा उपस्थित करीत अबू आझमी यांनी आपल्या समर्थकांना सांगितले की, "ही महिला (वरिष्ठ पोलिस निरीक्षक शालिनी शर्मा) म्हणते की, आपण पोलिसांवर आरोप करता, मी बोलणार नाही. त्यावर अबू आझमी म्हणतात, तुझ्या बापाचा बापाचा बाप पण बोलेल ". हे प्रक्षोभक वक्तव्य आझमी यांना भोवलं आहे. 

 

धक्कादायक! ठाण्यात गळयावर वार करुन महिलेचा खून

 

मोबाईलवर येत होते अश्लील मेसेज आणि फोटो, दहावीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या 

 

शालिनी शर्मा यांनी घेतला चेंबूर पोलीस ठाण्याचा चार्ज


या घटनेनंतर कर्तव्यनिष्ठ शर्मा यांची चेंबूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी चेंबूर पोलीस ठाण्याचे जयप्रकाश भोसले यांच्यावर नागपाड़ा पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविन्यात आली आहे. शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारला.

 

Web Title: Insult to female police officer by Abu Azmi; Filed a case pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.