मोबाईलवर येत होते अश्लील मेसेज आणि फोटो, दहावीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 08:37 PM2020-05-29T20:37:34+5:302020-05-29T20:51:38+5:30

ही खळबळजनक घटना पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील आहे.

इयत्ता 12 वीचा विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थिनीला 6 महिन्यांपासून त्रास देत होता. तो विद्यार्थ्याला अश्लील पोस्ट आणि मेसेज पाठवत होता. जेव्हा विद्यार्थिनीच्या कुटुंबातील सदस्यांना हे कळले तेव्हा त्यांनी विद्यार्थिनीकडून त्याबद्दल जाणून घ्यायचे होते. दुसर्‍याच दिवशी विद्यार्थिनीने बहुमजली इमारतीतून उडी मारली आणि तिचा मृत्यू झाला.

हावडा जिल्ह्यातील शिवपूर पोलिस स्टेशन परिसरातील अतिन मुखर्जी लेन भागात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. मृत विद्यार्थिनी १८ वर्षीयआहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता 12 वीचा विद्यार्थी एका १० वीच्या विद्यार्थिनीला त्रास देत असे. अनेक प्रकारचे अश्लील मेसेजेस देऊन तो विद्यार्थिनीला त्रास देत असे.

बुधवारी विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना या प्रकरणाची माहिती मिळाली. गुरुवारी कुटुंबातील सदस्याने विद्यार्थिनीकडून याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून विद्यार्थिनीला उदास वाटू लागले. त्यानंतर गुरुवारी दुपारी विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

मुलीच्या कुटूंबाच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थि गेल्या 6 महिन्यांपासून मुलीला त्रास देत होता. तो तिला अश्लील फोटो आणि मेसेज पाठवत असे. यामुळे विद्यार्थिनीने आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.