वणीत आयपीएल क्रिकेट सट्टयावर धाड, तीन अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 18:33 IST2020-10-19T18:32:34+5:302020-10-19T18:33:44+5:30
IPL Cricket Betting : नऊ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

वणीत आयपीएल क्रिकेट सट्टयावर धाड, तीन अटकेत
ठळक मुद्देधाडीत आठ मोबाईल हॅन्डसेट, एक क्रेटा कंपनीची कार, तसेच विविध साहित्य, असा एकूण नऊ लाख ७० हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वणी(यवतमाळ) - कायर मार्गावर असलेल्या शिरगिरी जंगलात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्टयावर वणी पोलिसांनीधाड टाकली. रविवारी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत सैय्यद मिनाज सैय्यद मुमताज, जमशेद हुसेन राशीद व मंगल विठ्ठल खाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. धाडीत आठ मोबाईल हॅन्डसेट, एक क्रेटा कंपनीची कार, तसेच विविध साहित्य, असा एकूण नऊ लाख ७० हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.