Raid on the bar; 61 people were taken into custody | बारवर छापा; ६१ जणांना घेतले ताब्यात  
बारवर छापा; ६१ जणांना घेतले ताब्यात  

मुंबई - मुंबईपोलिसांनी बोरिवलीतील एका बारमध्ये छापा टाकल्यानंतर ६१ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी योगायोगाने सापडलेल्या चार मुलींनाही मुक्त केले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये 29 ग्राहक आणि 32 बारमधील लोकं आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती कि, बारमध्ये अश्लील नृत्य सुरू असलेल्या व्हिडीओ क्लिप पोलिसांनी सापडली. त्यानंतर बारवर छापा टाकण्यात आला. रविवारी रात्री अकराच्या सुमारास बोरिवलीतील बारवर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर रविवारी कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. भा. दं. वि.  कलम २९४ , ११४ आणि ३४ अंतर्गत सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. 


Web Title: Raid on the bar; 61 people were taken into custody
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.