शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

सिंहगड इन्स्टिट्युटमध्ये रॅगिंगचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 3:09 PM

शनिवारी रात्री हा तरुण हॉस्टेलमधील रुममध्ये झोपलेला होता़.तेव्हा पहाटे दीड वाजता त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये शिकणारे व हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सात ते आठ तरुणांनी मुलाच्या डोक्यात आरसा फोडत मारहाण केली.

ठळक मुद्देभाई म्हणायला लावणाऱ्या आठ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखलयाप्रकरणी जळगाव येथील राहणाऱ्या १९ वर्षाच्या विद्यार्थ्याने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद

पुणे : मित्राला झालेल्या मारहाणीविषयी पालकांना आणि हॉस्टेल रेक्टर व प्राचार्यांना सांगण्याचा सल्ला का दिला या कारणावरून सिंहगड हॉस्टेलच्या सात ते आठ तरुणांनी एका मुलाच्या डोक्यात आरसा फोडत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सिंहगड इंजिनियरींग कॉलेजच्या ८ विद्यार्थ्यांविरुद्ध रॅगिंग अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी जळगाव येथील राहणाऱ्या १९ वर्षाच्या विद्यार्थ्याने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. ही घटना येवलेवाडी येथील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज हॉस्टेलमध्ये १३ आॅक्टोंबरला रात्री दीड वाजता घडली होती. फिर्यादी तरुणाच्या मित्राला काही जणांनी मारहाण केली होती़. त्याची तक्रार हॉस्टेलच्या रेक्टर व प्राचार्यांकडे कर असा सल्ला या तरुणाने दिला होता़. शनिवारी रात्री आॅक्टोबरला हा तरुण त्याच्या हॉस्टेलमधील रुममध्ये झोपलेला होता़. तेव्हा पहाटे दीड वाजता त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये शिकणारे व हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सात जण त्याच्या रुममध्ये आले़. त्याच्या मित्राला झालेल्या मारहाणीविषयी पालकांना आणि हॉस्टेल रेक्टर व प्राचार्यांना सांगण्याचा सल्ला का दिला या कारणावरून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़. तू पुण्यामध्ये कसा राहतो, तुला संपवून टाकतो, तुला येथून सोडत नाही, अशी धमकी दिली़. त्याला बाहेर जाऊ न देता त्याच्या डोक्यात आरसा फोडून, डोळ्यावर हाताने मारहाण केली़. त्यानंतर त्या तरुणाला सर्वांना भाई म्हणून नमस्कार करायचा अशी धमकी दिली़. त्याला सर्वांसमोर वाकून भाई म्हणायला लावले़. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी ४ जणांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. काळे तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसsinhagad instituteसिंहगड इन्स्टिट्युटStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारी