पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 06:11 IST2025-11-23T06:10:38+5:302025-11-23T06:11:20+5:30
पिस्तूल तयार करण्याचे साहित्य, शस्त्राचे सुटे भाग जप्त केले. धातू तयार करण्यासाठी बनविलेल्या भट्टया नष्ट केल्या.

पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
पुणे - विमानतळ येथील गुन्ह्यांच्या अनुषंगाने पुणेपोलिसांच्या १०५ जणांच्या पथकाने मध्य प्रदेशातील उमरटी या गावात कारवाई करून शस्त्रसाठ्यांचे अड्डे आणि शस्त्र बनविणाऱ्या ५० भट्टया नष्ट केल्या. या कारवाईत पुणे पोलिसांनी ड्रोन, मेटल डिटेक्टरसह मध्य प्रदेश पोलिसांची मदत घेऊन शनिवारी दुपारपर्यंत ३६ जणांना ताब्यात घेतले असून, २१ पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर दारूगोळा जप्त केला आहे.
या माध्यमातून पुणे पोलिसांनी एक मोठे आंतरराज्यीय अवैध शस्त्रास्त्र पुरवठा व तस्करी करणारे रॅकेट उद्ध्वस्त केले. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात विमानतळ पोलिस, खंडणीविरोधी पथक व गुन्हे शाखा आदींच्या कारवाईत २१ शस्त्रे जप्त केली होती. उमरटीमधून ही सर्व शस्त्रे येत असल्याचे आढळले होते.
ड्रोन वापरून आधी केली पाहणी अन् पहाटे अचानक गावावर टाकला छापा
परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उमरटी गावाजवळ गेल्यानंतर आधी ड्रोनचा वापर करून संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यानंतर पहाटे या गावावर छापा टाकून बेकायदा शस्त्र बनविणारे कारखाने असलेल्या ५० घरांची झडती घेतली. पिस्तूल तयार करण्याचे साहित्य, शस्त्राचे सुटे भाग जप्त केले. धातू तयार करण्यासाठी बनविलेल्या भट्टया नष्ट केल्या.
मध्य प्रदेश राज्यामधील उमरटी येथील कारवाई 66 के किती जणांना ताब्यात घेतले व नेमकी किती शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला, याची माहिती समजणार आहे - रंजनकुमार शर्मा, सहपोलिस आयुक्त