किरकोळ वादातून तलवारीने दोन युवकांचा खून, रात्रीच्या घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 10:30 IST2021-07-05T10:30:27+5:302021-07-05T10:30:55+5:30

शिवम संतोष शितकल (वय २३) गणेश रमेश माखर (वय २३, दोघेही रा. पाटस , अंबिकानगर ता.दौंड.जि.पुणे,) असे खुन झालेल्या युवकांची नावे आहेत.

Pune - The murder of the two by the sword in a minor dispute, the commotion everywhere patas by the incident of the night | किरकोळ वादातून तलवारीने दोन युवकांचा खून, रात्रीच्या घटनेने खळबळ

किरकोळ वादातून तलवारीने दोन युवकांचा खून, रात्रीच्या घटनेने खळबळ

ठळक मुद्देशिवम संतोष शितकल (वय २३) गणेश रमेश माखर (वय २३, दोघेही रा. पाटस , अंबिकानगर ता.दौंड.जि.पुणे,) असे खुन झालेल्या युवकांची नावे आहेत.

पुणे/दौंड :  फोनवरून शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांची काठ्या, तलवारी आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. दौंड तालुक्यातील पाटसच्या परिसरातील  तामखंडा येथील भानोबा मंदीरा समोर रविवारी (दि.४ ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घटना घडली. दरम्यान, आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाले आहेत. याघटनेमुळे रात्रीपासून पाटसमध्ये तणावाचे वातावरण आहे.

शिवम संतोष शितकल (वय २३) गणेश रमेश माखर (वय २३, दोघेही रा. पाटस , अंबिकानगर ता.दौंड.जि.पुणे,) असे खुन झालेल्या युवकांची नावे आहेत. याप्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत मोहन टुले दोघे रा.पाटस (तामखंडा ), योगेश शिंदे ( रा. गिरिम ता.दौंड जि.पुणे ) व इतर चार ते पाच अनोळखी इसम अशी या आरोपींची नावे असून ते पसार झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवम शितकल आणि गणेश माखर यांना मन्या उर्फ महेश संजय भागवत यांच्या मोबाईलवरुन  विनाकारण शिव्या दिल्या, शिव्या का दिल्या असा जाब विचारायला गेले असता आरोपींनी त्यांना काठ्या व तलवार आणि डोक्यात दगड घालून निघृन्न हत्या केल्याची घटना घडली.

Web Title: Pune - The murder of the two by the sword in a minor dispute, the commotion everywhere patas by the incident of the night