पुणे गुन्हे शाखेने ठाण्यातून अरुण परेराला घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 16:57 IST2018-08-28T16:53:35+5:302018-08-28T16:57:51+5:30

त्याच्याकडून पुस्तकं, वह्या आणि लॅपटॉप, पेन ड्राइव जप्त केले आहेत. आज दुपारी तीन वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. 

Pune crime branch detained Arun Perera from Thane in bhima koregaon matter | पुणे गुन्हे शाखेने ठाण्यातून अरुण परेराला घेतले ताब्यात 

पुणे गुन्हे शाखेने ठाण्यातून अरुण परेराला घेतले ताब्यात 

ठाणे -  चरई येथील शेरॉन सोसयटी मधिल अरुण परेरा याला पुणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.  भीमा कोरेगावच्या हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेच्या अनुषंगाने हैदराबाद उत्तर प्रदेश ,मुंबई ठाणे येथे पुणे गुन्हे शाखेने ज्या धाडी टाकल्या त्यात आज ठाणे येथे चरईमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून धाडी टाकल्या आणि त्यानंतर अरुण परेरा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पुस्तकं, वह्या आणि लॅपटॉप, पेन ड्राइव जप्त केले आहेत. आज दुपारी तीन वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. अरुण परेराच्या म्हणण्यानुसार मानवाधिकाराचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केली गेली आहे.

Web Title: Pune crime branch detained Arun Perera from Thane in bhima koregaon matter