शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

पब्जीने घेतला विद्यार्थ्याचा बळी, गळफास लावून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 3:43 PM

पुण्यात हॉटेल मॅनेजमेंट शिकायचा हा विद्यार्थी 

ठळक मुद्देरितिक किशोर ढेंगे (वय १९) असे त्याचे नाव असून तो अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुना फुटाळा कॉर्पोरेशन लाईन जवळ राहत होता.रितीकचे वडील एका शिक्षण संस्थेत सेवारत असून आई गृहिणी आहे. रितीकला एक लहान भाऊ आहे. तो पुण्याच्या एका कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला शिकत होता.

नागपूर : पब्जीच्या आहारी गेलेल्या एका विद्यार्थ्याने अखेर गळफास लावून आत्महत्या केली. रितिक किशोर ढेंगे (वय १९) असे त्याचे नाव असून तो अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुना फुटाळा कॉर्पोरेशन लाईन जवळ राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितीकचे वडील एका शिक्षण संस्थेत सेवारत असून आई गृहिणी आहे. रितीकला एक लहान भाऊ आहे. तो पुण्याच्या एका कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला शिकत होता. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर तो नागपुरात आपल्या घरी परतला. त्यानंतर तो रात्रंदिवस मोबाईलमध्ये व्यस्त राहायचा. कुटुंबातील सदस्यांनी लक्ष घातले असता तो सारखा पब्जी गेम खेळत असल्याचे त्यांना कळले. वडिलांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नव्हता. तो पबजीच्या एवढा आहारी गेला होता की खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करून तो रात्रंदिवस पब्जीच खेळत राहायचा. त्यामुळे त्याला भयंकर डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता. पब्जी खेळला नाही तर तो असामान्य वागायचा आणि पब्जी खेळत असला कि त्याचे डोके दुखायचे. त्याच्या या समस्येमुळे ढेंगे कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. नातेवाइकांचा सल्ला घेतल्यानंतर रितिकचे वडील किशोर ढगे यांनी त्याचा उपचार एका डॉक्टरांकडे सुरू केला. मात्र तो दाद देत नव्हता. उपचार घेत असतानाही तो मोबाईलवर व्यस्त असायचा. या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास रितीकने घरात गळफास लावून घेतला. घरच्यांना ते दिसल्यानंतर त्यांनी लगेच त्याला खाली उतरवले आणि उपचाराकरिता खासगी इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी रितीकला तपासून मृत घोषित केले.

मिळालेल्या सूचनेवरून अंबाझरीचे ठाणेदार विजयी करे यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांना त्याच्या घरी पाठविले. रितीकच्या घराची तपासणी करण्यात आली. मात्र त्याच्याकडे मोबाईल व्यतिरिक्त काहीही आढळले नाही. त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहून ठेवली नाही, असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपीका कोडापे यांनी सांगितले. परितीकचे वडील किशोर मनोहर ढेंगे यांनी पोलिसांना माहिती देताना रितिकला पब्जीचा नाद होता आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. कुटुंबीयांना मानसिक धक्का रितीक हा अतिशय हुशार विद्यार्थी होता.  पुण्याला शिकायला जाण्यापूर्वी  त्याला  कसलाही नाद नव्हता. मात्र  पुण्याहून परतल्यानंतर  तो रात्रंदिवस  पब्जी खेळत राहायचा आणि त्याच मुळे  त्याला जीव गमवावा लागला. त्याच्या आत्मघाती पावलामुळे रितिकचे आई-वडील आणि छोट्या भावाला  जोरदार मानसिक धक्का बसला असून  परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूरPoliceपोलिसPUBG Gameपबजी गेम