शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

कर्जबाजारी झाला म्हणून घरातूनच सुरू केली बनावट नोटांची छपाई, यूट्युबवरून घेतले प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 3:44 AM

Crime News : चेंबूर परिसरात मंगळवारी एक जण बनावट नोटा वाटण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली.

मुंबई : कर्जबाजारी झाला म्हणून ३५ वर्षीय तरुणाने चेंबूरमध्ये घरातूनच बनावट नोटांची छपाई सुरू केल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईत उघड झाला आहे. याप्रकरणी मोहम्मद फकियान अयुब खान (३५) याला पोलिसांनी अटक केली. त्याने यूट्यूबवरून याचे प्रशिक्षण घेतले होते.गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने ही कारवाई केली. चेंबूर परिसरात मंगळवारी एक जण बनावट नोटा वाटण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्याच्या अंगझडतीत ५५ हजार ४५० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. त्याने चेंबूर येथील एमएमआरडीए वसाहतीत भाड्याने खोली घेतली हाेती. तेथेच यु ट्यूबवर पाहून त्याने बनावट नोटांची छपाई सुरू केली होती. खान याच्या घरातूनही लाखोंच्या नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच कलर प्रिंटर, हिरव्या रंगाचे पेपर रोल, पारदर्शक डिंक, वेगवेगळ्या रंगाचे पेन आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले.नोकरी सुटल्यामुळे त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला हाेता. यातूनच झटपट पैसा कमाविण्यासाठी त्याने अशाप्रकारे बनावट नोटांचा छापखाना सुरू केल्याचे त्याच्या चाैकशीतून समाेर आले. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी