"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:59 IST2025-09-25T12:58:42+5:302025-09-25T12:59:50+5:30
संध्या नावाच्या एका महिलेने तिचा बॉयफ्रेंड विकाससोबत मिळून पती रवी सिंहची हत्या केली.

फोटो - आजतक
प्रयागराजमध्ये संध्या नावाच्या एका महिलेने तिचा बॉयफ्रेंड विकाससोबत मिळून पती रवी सिंहची हत्या केली. रवी शेतात मजुरांना जेवण देण्यासाठी गेला असताना ही घटना घडली. संध्या विकासच्या प्रेमात पडली होती म्हणून हत्येचा कट रचण्यात आला. संध्याने फोनवरून रवीचं लोकेशन विकासला सांगितलं, त्यानंतर विकासने लोखंडी रॉडने त्याची हत्या केला. हत्येनंतर विकासने रवीचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. कॉल डिटेल्समुळे हे प्रकरण समोर आलं आहे.
यमुनानगरच्या शंकरगड येथील रवी सिंहचं लग्न संध्याशी झालं होतं. मात्र काही दिवसांनी संध्या त्याच गावातील विकास या तरुणाच्या प्रेमात पडली. रवीच्या अनुपस्थितीत दोघेही अनेकदा भेटत आणि फोनवर बोलत असत. रवीला या प्रेमसंबंधांबद्दल कळताच दोघांमध्ये वाद सुरू झाले. या वादाला कंटाळून संध्याने विकाससोबत मिळून रवीला मारण्याचा भयंकर कट रचला.
फोनवरून रवीच्या लोकेशनची माहिती
हत्येच्या दिवशी रवी त्याच्या शेतात मजुरांना जेवण देण्यासाठी गेला होता. याच दरम्यान संध्याने विकासला फोनवरून रवीच्या लोकेशनची माहिती दिली आणि तिला रविपासून स्वातंत्र्य हवं असल्याचं म्हटलं आहे. विकास ताबडतोब घटनास्थळी पोहोचला आणि रवीवर लोखंडी रॉडने हल्ला केला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर संशय येऊ नये म्हणून विकासने रवीचा मृतदेह जवळच्या विहिरीत फेकून दिला.
संध्याच्या कॉल डिटेल्सची तपासणी
रवी घरी परतला नाही तेव्हा कुटुंबाने बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि संध्याच्या कॉल डिटेल्सची तपासणी केली. कॉल डिटेल्सवरून असं दिसून आले की, संध्या हत्येपूर्वी आणि नंतर विकासशी वारंवार बोलली होती. यावरून पोलिसांनी विकासला अटक केली. चौकशीदरम्यान विकासने संपूर्ण सत्य सांगिकलं. बॉयफ्रेंडच्या खुलाशानंतर आरोपी पत्नीलाही अटक करण्यात आली आहे.