प्रभादेवीत तरुणीसोबत अश्‍लील वर्तन करणाऱ्या टॅक्‍सी चालकाविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 23:28 IST2019-07-01T23:26:50+5:302019-07-01T23:28:25+5:30

तरुणीकडून सोशल साईटवर व्हिडीओ वायरल; टॅक्सी चालक पोलिसांच्या ताब्यात

In prabhadevi taxi driver has behaved objectionable with girl | प्रभादेवीत तरुणीसोबत अश्‍लील वर्तन करणाऱ्या टॅक्‍सी चालकाविरोधात गुन्हा

प्रभादेवीत तरुणीसोबत अश्‍लील वर्तन करणाऱ्या टॅक्‍सी चालकाविरोधात गुन्हा

ंबई - सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर घरी जात असलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांसमोर एका विकृत टॅक्‍सीचालकाने अश्‍लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी तिने सोशल मीडियावर माहिती देऊन पोलिसांकडे तक्रार केली आहे. प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरातून निघाल्यावर घरी जाण्यासाठी आम्ही टॅक्‍सी केली. टॅक्‍सीत बसल्यानंतर चालकाने त्याच्या पॅण्टची झिप उघडून अश्‍लील वर्तन सुरू केले सोशल मीडियावर असे तिने लिहिले आहे. हा धक्कादायक प्रकार 27 जूनला सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती या 21 वर्षांच्या तरुणीने दिली. दरम्यान, तिच्यासोबत आई आणि बहीण होती. या विकृत टॅक्‍सीचालकाचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ही पोस्ट लिहावी की नाही याबाबत मी खूप विचार केला. अखेरीस मी हा व्हिडीओ टाकत आहे. या घटनेच्या वेळी मी कोणते कपडे घातले होते. याबाबत चर्चा सुरू होण्याआधी स्पष्ट करू इच्छिते, की मी सामान्य जीन्स आणि टॉप परिधान केला होता, असेही तिने म्हटले आहे. आई आणि बहिणीला वाचवण्यासाठी तिने चालकाला टॅक्‍सी थांबवण्यास सांगितले. मात्र, तिने सांगूनही तो टॅक्‍सी थांबवत नव्हता. तुम्ही उगाच घाबरताय असे म्हणत तो माफी मागत असल्याचे या व्हिडीओत दिसते. या तरुणीने फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित टॅक्‍सीचालकाला ताब्यात घेतले आहे.

Web Title: In prabhadevi taxi driver has behaved objectionable with girl