लॉजवर नेऊन अश्लील फोटो, व्हिडीओ काढले; बळजबरीने केले शारीरिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 15:39 IST2022-06-12T15:29:43+5:302022-06-12T15:39:06+5:30
Rape Case : प्रदिप बाळासो शिंदे असे या तरुणाचे नाव असून याप्रकारामुळे परीसरातुन तिव्र प्रताप संताप व्यक्त होत आहे.

लॉजवर नेऊन अश्लील फोटो, व्हिडीओ काढले; बळजबरीने केले शारीरिक शोषण
मोरगाव : अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढून बळजबरीने शारीरिक संभोग केल्या प्रकरणी तरडोली ता. बारामती येथील एका तरुणावर वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. प्रदिप बाळासो शिंदे असे या तरुणाचे नाव असून याप्रकारामुळे परीसरातुन तिव्र प्रताप संताप व्यक्त होत आहे.
तरडोली येथील अल्पवयीन मुलगी मोरगाव येथील मयुरेश्वर विद्यालयात शाळेसाठी गेली असता प्रदीप बाळासो शिंदे याने या अल्पवयीन मुलीस मोटार सायकलवर जबरजस्तीने बसवून जेजुरी येथील ब्रम्हांड लॉजवर घेवुन जावुन तिचे जबरदस्तीने कपडे काढून तिचे अर्धनग्न अवस्थेत फोटो व व्हीडीओ काढून तिचे तिचे सोबत बळजबरीने शारीरीक संबंध केला व कोणाला काही सांगीतले तर फोटो व्हीडीओ सर्वांना पाठविन अशी धमकी दिली. या विरोधात मुलीच्या पालकांनी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे .
यानुसार आरोपी प्रदीप बाळासो शिंदे यावर भादवी कलम ३६३, ३७६, ५०६ व बाललैंगिक कायदा नुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास पोसई शेख करीत आहे.