शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाणचा मोबाईल, लॅपटॉप ‘या’ भाजपा नेत्यांनीच चोरला; शिवसेनेची पोलिसांकडे तक्रार

By प्रविण मरगळे | Published: March 03, 2021 11:46 PM

Pooja Chavan Suicide Case, Shiv sena Leader Sangeeta Chavan Filed Complaint Against BJP Chitra wagh, Dhanraj Ghogare: या तक्रारीत बंजारा समाजाची नाहक बदनामी आणि बंद फ्लॅटमध्ये जाऊन पूजा चव्हाणचा मोबाईल आणि लॅपटॉप चोरल्याचा आरोप त्यांनी भाजपा नेत्यांवर केला आहे.

ठळक मुद्देपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधक राजकारणाची पोळी भाजण्याच्या उद्देशाने आंदोलन मोर्चे काढून पीडित युवतीच्या कुटुंबाची आणि समाजाची बदनामी करत आहेतपीडित युवती गर्भवती होती, तिचा गर्भपात करण्यात आला अशा प्रकारे चारित्र्य हनन करणारे माहिती प्रसारित करत आहेतकायद्यानुसार पीडितेच्या नावाची बदनामी करणे कायद्याने गुन्हा आहे, तरीही कायद्याची पायमल्ली केली जात आहे

बीड – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानं राज्यातील राजकारण तापवलं आहे, या आत्महत्येमुळे अडचणीत आलेल्या शिवसेना नेते संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, या प्रकरणामुळे विरोधकांनी ठाकरे सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला, संजय राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका घेतली होती, आता शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख संगिता चव्हाण यांनी भाजपा नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.( Pooja Chavan mobile and laptop were stolen by BJP leaders Chitra Wagh, Dhanraj Ghogare, Shiv Sena Sangita Chavan lodged a complaint at the police station)

संगिता चव्हाण यांनी भाजपाच्या चित्रा वाघ आणि पुण्यातील नगरसेवक धनराज घोगरे यांच्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत बंजारा समाजाची नाहक बदनामी आणि बंद फ्लॅटमध्ये जाऊन पूजा चव्हाणचा मोबाईल आणि लॅपटॉप चोरल्याचा आरोप त्यांनी भाजपा नेत्यांवर केला आहे. तक्रारीत म्हटलंय की, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधक राजकारणाची पोळी भाजण्याच्या उद्देशाने आंदोलन मोर्चे काढून पीडित युवतीच्या कुटुंबाची आणि समाजाची बदनामी करत आहेत. चित्रा वाघ या सार्वजिनकरित्या पत्रकार परिषद घेत पीडित युवती गर्भवती होती, तिचा गर्भपात करण्यात आला अशा प्रकारे चारित्र्य हनन करणारे माहिती प्रसारित करत आहेत, त्यामुळे पीडितेच्या आईवडिलांना कुठेही तोंड दाखवण्याचे लायकीचे ठेवले नाही. कायद्यानुसार पीडितेच्या नावाची बदनामी करणे कायद्याने गुन्हा आहे, तरीही कायद्याची पायमल्ली केली जात आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

पूजा चव्हाण अन् शांताबाई राठोड यांच्यातील नात्याचा उलगडा; लहू चव्हाण खोटं बोलले?

त्याचसोबत बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करून काही मौल्यवान वस्तू, लॅपटॉप आणि मोबाईल चोरून मनाला वाटेल तसे काही फोटो, ऑडिओ क्लिप, व्हिडीओ छेडछाड करून सोशल मीडियात जाणुनबुजून पसरवले जात आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी सामुहिक आत्महत्येची धमकी देऊनही त्यांची बदनामी थांबवली नाही, त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संगिता चव्हाण यांनी पोलिसांकडे केली आहे.

भाजपा हायकोर्टात धाव घेणार

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपा आता थेट हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे, या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी यासाठी भाजपाकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार संजय राठोड(Shivsena Sanjay Rathod) यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या याचिकेत पूजा चव्हाणचा व्हिसेरा खासगी लॅबमध्ये तपासावा, तिच्या शारिरीकस्थितीचे, आजाराचे, कोणती शस्त्रक्रिया केली होती का? याची तपासणी करण्यात यावी अशी मागणी भाजपाने केली आहे, त्याचसोबत संजय राठोड आणि पूजा चव्हाणचे कॉल रेकॉर्डंस तपासावेत असंही म्हटलं आहे.

संशयामुळे कोणाचा बळी देऊ नका –पूजाचे वडील लहू चव्हाण

तर अलीकडेच लहू चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची(CM Uddhav Thackeray) भेट घेतली होती, या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संशयावरून संजय राठोड यांचा बळी देऊ नका, ते समाजाचे नेते आहेत, खूप कष्ट करून इथपर्यंत पोहचले आहेत, असं म्हणत चौकशी करावी, दोषींवर कारवाई कराल असा विश्वास वाटतो असं मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं, परंतु या पत्रानंतर दुसऱ्याच दिवशी शांताबाई राठोड यांनी लहू चव्हाण यांच्यावर ५ कोटी घेतल्याचे आरोप केले होते, शांताबाईंच्या या आरोपानंतर लहू चव्हाण यांनी परळी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. त्यात म्हटलं की, काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी असे करत आहेत. माझ्या मुलीची नाहक बदनामी केली जात आहे. शांता राठोड यांनी टीव्हीच्या माध्यमातून आमच्या मुलीशी काही संबंध नसताना स्वतःहून बदनामी करण्याच्या हेतूने खोटे आरोप केले आहेत असा आरोप त्यांनी केला

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडBJPभाजपाChitra Waghचित्रा वाघUddhav Thackerayउद्धव ठाकरे