कामाच्या तणावातून पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 17:24 IST2019-09-30T17:22:29+5:302019-09-30T17:24:17+5:30
सकाळी ९ वाजताच्यादरम्यान आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

कामाच्या तणावातून पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या
ठळक मुद्देपोलीस उपनिरीक्षक धनाजी राऊत (३५) असं आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.त्यांच्या पश्चात पत्नी वनिता आणि दोन मुले असा परिवार आहे.
ठाणे - कामाच्या तणावातून ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक धनाजी राऊत (३५) असं आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर भागात घडली. त्यांच्या पश्चात पत्नी वनिता आणि दोन मुले असा परिवार आहे. सकाळी नेहमीप्रमाणे ते व्यायामासाठी बाहेर पडल्यानंतर रेप्टाक्रॉस कंपनीच्या मैदानात एका झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते सकाळी ९ वाजताच्यादरम्यान आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.