स्टंटबाजांचा धुमाकूळ; ११ दुचाकी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 21:40 IST2019-04-22T21:39:05+5:302019-04-22T21:40:24+5:30

शनिवारी वांद्रे येथील वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

police seized 11 bikes who stunted on streets of mumbai | स्टंटबाजांचा धुमाकूळ; ११ दुचाकी जप्त

स्टंटबाजांचा धुमाकूळ; ११ दुचाकी जप्त

ठळक मुद्दे स्टंटबाजी करणाऱ्या १४ जणांवर शनिवारी वांद्रे येथील वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. चार गुन्ह्यांची नोंद करुन नंतर त्यांना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ११ बाईक जप्त केल्या.

मुंबई - रस्त्यावर भरधाव वेगाने गाडी चालवत स्टंटबाजी करणाऱ्या १४ जणांवर शनिवारी वांद्रे येथील वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यात एका रिक्षाचाही समावेश असून पोलिसांनी ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. 

वांद्रे-वरळी सी लिंकसह वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रात्रीच्या वेळेस स्टंटबाजी पुन्हा सुरू झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांना मिळाली होती.  त्यानुसार शनिवारी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी वेगात दुचाकी चालवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत होते.  त्यात एका रिक्षा चालकाचाही समावेश होता. रात्री बारा ते पहाटेपर्यंत स्टंटबाजी करणाऱ्या १४ तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरोधात चार गुन्ह्यांची नोंद करुन नंतर त्यांना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ११ बाईक जप्त केल्या.

Web Title: police seized 11 bikes who stunted on streets of mumbai