शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, कॅमेरासमोर बोलण्यास पोलिसांचा नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 21:42 IST

sex racket in Dombivli : डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना रोडला सांगर्ली चौकात बालाजी दर्शन इमारत आहे. या इमारतीसमोर साईराज लॉजिंग अँड बोर्डिंग आहे. या लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची खबर मिळताच ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलला मिळाली होती.

कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. अचानक टाकण्यात आलेल्या या छाप्यात चार तरुणींची सुटका करण्यात आली असून या कारवाईत लॉजिंग-बोर्डिंगच्या व्यवस्थापकासह ६ जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलने  ही कारवाई केली आहे. त्यामुळे गजबजलेल्या परिसरात सुरू असलेल्या या अनैतिकत धंद्याबद्दल स्थानिक पोलिसांना काहीच माहीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच यासंदर्भात स्थानिक पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. 

डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना रोडला सांगर्ली चौकात बालाजी दर्शन इमारत आहे. या इमारतीसमोर साईराज लॉजिंग अँड बोर्डिंग आहे. या लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची खबर मिळताच ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलला मिळाली होती. सोमवारी रात्री या ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. यावेळी चार तरुणी तेथे वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या आहेत. साईराज उर्फ विराज लॉजिंग बोर्डिंगमध्ये अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता. 

लॉजमध्ये पोलिसांनी बोगस गि-हाईक पाठवून प्रथम खात्री केली.त्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह टिळकनगर पोलिसांनी या लॉजवर अचानक छापा टाकला. त्यानंतर लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींच्या पुरवठा करणा-या दोन दलालांना ताब्यात घेत  ४ तरुणींची सुटका केली. टिळकनगर पोलिस ठाण्यात  सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.  डोंबिवलीमध्ये दाटीवाटीच्या परिसरात हा प्रकार सुरू होता. मात्र स्थानिक पोलिसांना याचा कोणताही सुगावा लागला का लागला नाही? असा सवाल  निर्माण झाला आहे. मात्र ठाणे पोलिसांनी  हा सर्व प्रकार उघड केल्याने ठाणे पोलिसांच्या कामगिरीच सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली