Police raid on Vasai bar | वसईच्या बारवर पोलिसांची धाड
वसईच्या बारवर पोलिसांची धाड

नालासोपारा - वसई पश्चिमेकडील नवघर रोडवरील माणिकपूर मैदानाच्या बाजूलाच असलेल्या अनिता अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील जेनिस स्नॅक्स बार या सर्विस बारवर एलसीबीने सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास धाड मारून पोलिसांनी बार मॅनेजरसह दोन वेटर, दोन ग्राहक आणि 13 महिला असे एकूण 18 जणांना ताब्यात घेतले आहे. 

जेनिस या सर्विस बारमध्ये अश्लील चाळे, विभीस्त हावभाव करून ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना मिळाल्यानंतर एलसीबीची टीम नेऊन सदर बारवर सोमवारी रात्री धाड टाकली आहे.


Web Title: Police raid on Vasai bar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.