शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याचा तरुणीवर बलात्कार; विवाहानंतर फुटले बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 13:45 IST

पती व सासरच्यांनी तिला चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात नेले असता पीडिता तीन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले.

जळगाव : शेतात कापूस वेचण्याच्या कामाला येत असलेल्या तरुणीवर शेत मालक असलेल्या कैलास तुकाराम धाडी (रा.लोणवाडी, ता.जळगाव) याने अत्याचार केला. त्यातून पीडित तरुणी तीन महिन्याची गर्भवती राहिली आहे. कैलास हा जिल्हा पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात पीडितेच्या फिर्यादीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास धाडी हा लोणवाडी येथील रहिवाशी आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये गावातील १९ वर्षीय तरुणी त्याच्या शेतात कापूस वेचण्याच्या कामासाठी आलेली असताना विहिरीवर पाणी घेण्यासाठी जाताना एका पत्र्याच्या शेडमध्ये कैलास याने पीडितेवर जबरदस्ती अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवंत ठेवणार नाही अशी धमकी तिला दिली. त्यामुळे पीडितेने या प्रकाराची वाच्यता केली नाही. मध्यंतरीच्या काळातही कैलास याने सतत त्याच पत्र्याच्या खोलीत वारंवार अत्याचार केला.

विवाहानंतर फुटले बींग

या घटनेनंतर २४ मे २०२० रोजी पीडित तरुणीचे लग्न झाले. २८ मे रोजी त्रास होत असल्याने पती व सासरच्यांनी तिला चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात नेले असता पीडिता तीन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. तेव्हा पीडितेने झाल्या प्रकाराची पती व सासरच्यांना माहिती दिली. रविवारी पीडिता माहेरी आली असता कुटुंबाला घेऊन तिने रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले.

झाल्याप्रकाराची माहिती कथन केल्यानंतर मानव संसाधन विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडितेची फिर्याद घेतली. तेव्हा मध्यरात्री कैलास तुकाराम धाडी याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व कॉन्स्टेबल रतिलाल पवार करीत आहेत. दरम्यान, कैलास याच्या शोधार्थ पोलिसांचे एक पथक रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

धाडीची कारकिर्द वादग्रस्त

कैलास धाडी हा जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहे. २०१८ मध्ये त्याची एमआयडीसी पोलीस ठाण्यातून पहूरला बदली झाली होती. मात्र तो पहूर येथे हजरच झाला नाही. त्यामुळे त्याची मुळ नेमणूक कुठे आहे, हेच स्पष्ट होत नाही. असे असताना त्याचे वेतन व इतर भत्ते मात्र नियमित निघत आहेत. मुख्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकांचीही भूमिका यात संशयास्पद आहे. धाडी याच्याविरुध्द याआधी देखील गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसRapeबलात्कारArrestअटकJalgaonजळगाव