पोलिसाने राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 23:24 IST2019-02-15T23:23:34+5:302019-02-15T23:24:12+5:30
पोलीस कॉन्स्टेबल मनोज केशव सावंत (४३) यांनी गुरुवारी पंतनगर येथील निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली

पोलिसाने राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या
मुंबई - टिळकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल मनोज केशव सावंत (४३) यांनी गुरुवारी पंतनगर येथील निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर पोलीस वसाहतीमध्ये मनोज सावंत पत्नी आणि दोन मुले परिवारासह राहत होते. गुरुवारी घरात कोणी नसताना सावंत यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळावरून सुसाईड नोट तसेच इतर काहीच न मिळाल्याने आत्महत्येमागील नेमके कारण उघड झालेलं नाही. मात्र, घरगुती वादातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. सावंत यांची सहा महिन्यांपूर्वीच टिळकनगर पोलीस ठाण्यात बदली झाली होती.