7 जणांच्या पायावर एकाच ठिकाणी लागली गोळी, UP पोलिसांचे अनोखे एनकाउंटर चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 05:44 PM2021-11-12T17:44:38+5:302021-11-12T17:45:41+5:30

गाझियाबादच्या हाजीपूर परिसरातील एका गोदामात जनावरांची कत्तल केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी पोहोचले.

UP Police encounter with cow smugglers, 7 shot at same spot on leg | 7 जणांच्या पायावर एकाच ठिकाणी लागली गोळी, UP पोलिसांचे अनोखे एनकाउंटर चर्चेत

7 जणांच्या पायावर एकाच ठिकाणी लागली गोळी, UP पोलिसांचे अनोखे एनकाउंटर चर्चेत

googlenewsNext

गाझियाबाद:उत्तर प्रदेशपोलिस आणि एनकाउंटर हा नेहमी देशात चर्चेचा विषय असतो. उत्तर प्रदेशातीलपोलिस आणि गुन्हेगारांच्या चकमकीच्या अनेक घटना समोर येतात. अशाच प्रकारची एक चकमक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांची गुरुवारी गौ तस्करांसोबत झालेली चकमक सध्या चर्चेत आहे. 

सर्व तस्करांच्या पायावर एकाच ठिकाणी गोळी

गुरुवारी लोणी सीमा पोलिसांची गौ तस्करांशी चकमक झाली. चकमकीत 7 गौ तस्कर पोलिसांच्या गोळ्यांनी जखमी झाले, त्यांना नंतर अटक करण्यात आली. तर, गौ हत्येत सहभागी असलेले दोन जण घटनास्थळावरुन पळून गेले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक पिस्तूल आणि धारदार शस्त्रेही सापडली आहेत. विशेष म्हणजे, जखमी झालेल्या सर्व तस्करांच्या पायावर एकाच ठिकाणी गोळी लागल्याने चकमकीवर मोठा प्रश्न उपस्थित होतोय.

नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या बेहटा हाजीपूर परिसरातील एका गोदामात जनावरांची कत्तल केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच लोणी पोलिस गोदामात पोहोचले, तेथे काही लोक गुरे कापण्यासाठी जात होते. यादरम्यान तस्करांनी पोलिसांवर गोळीबार करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी सुमारे सात राऊंड फायर केले, तर प्रत्युत्तरात पोलिसांनी 16 गोळ्या झाडल्या. गोदामात वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसलेल्या आरोपींच्या पायाला गुडघ्याच्या खाली गोळ्या लागल्या. जखमी झाल्यानंतर आरोपींनी गोळीबार थांबवला आणि शस्त्रे खाली ठेवली, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

Web Title: UP Police encounter with cow smugglers, 7 shot at same spot on leg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.