शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Police Crushed to death: 'वर्दी'ला चिरडले! गेल्या 24 तासात ड्यूटीवर असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांची चिरडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 14:09 IST

Police Crushed to death: हरियाणा-झारखंड आणि गुजरातमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना ट्रक-डंपरखाली चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली: देशात गेल्या 24 तासांत तीन पोलिसांना ट्रक-डंपरने चिरडून ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. गुजरातच्या आनंदमधून एक ताजे प्रकरण समोर आले आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. यापूर्वी हरियाणातील डीएसपी सुरेंद्र सिंह बिश्नोई यांना खडीच्या डंपरने चिरडल्याची घटना घडली. तसेच, झारखंडमधील महिला पोलिस एसआय संध्या टोपने यांचीही अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील आनंद येथे मंगळवार मध्यरात्री वाहतूक पोलिस राजकिरण यांना ट्रकने चिरडले. माहिती मिळताच त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात होता की जाणीवपूर्वक केलेले कृत्य? याबाबत पोलीस अजूनही तपास करत आहेत. पोलिसांनी गाडी जप्त केली असून, आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे.

झारखंडमध्ये महिला पोलिसाची हत्यायाआधी बुधवारी पहाटे 3 वाजता झारखंडमधील रांचीमध्ये महिला पोलीस एसआय संध्या टोपने यांचा पिकअप व्हॅनच्या धडकेने मृत्यू झाला. रांची एसएसपी म्हणाले की, प्राण्यांची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून रात्री वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली होती, यावेळी पोलिसांच्या पथकाने पिकअप व्हॅनला थांबवण्याचा इशारा दिला तेव्हा चालकाने गाडीचा वेग वाढवून महिला पोलिस अधिकाऱ्याला चिरडले. या घटनेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी गाडीसह एका आरोपीला अटक केली आहे.

हरियाणात DSPचा मृत्यूदुसरीकडे, हरियाणातील नूह जिल्ह्यात मंगळवारी दुपारी तवादचे डीएसपी सुरेंद्र सिंह बिश्नोई यांची चिरडून हत्या करण्यात आली. पाचगाव टेकडी परिसरात सुरू असलेले दगडाचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी पोलीस अधिकारी गेले होते. कागदपत्रे तपासण्यासाठी डीएसपींनी एका डंपर-ट्रकला थांबण्याचा इशारा दिला, मात्र चालकाने वेग वाढवत त्यांना चिरडले. या घटनेनंतर आरोपीला पकडण्यात आले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूJharkhandझारखंडHaryanaहरयाणाGujaratगुजरात